पुणे दि २९ –
‘तिरंगा राष्ट्र ध्वजाच्या निमित्ताने ‘संविधान प्रणीत प्रजासत्ताक भारताचा, स्वातंत्र्य दिनाचा व आता राष्ट्रपिता महात्मा गांधींचा’ सतत अवमान करणाऱ्या संभाजी ऊर्फ मनु भिडे या विकृत प्रवृत्तीचा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस तीव्र निषेध करीत असून, ही विकृत प्रवृतीचे भाजप समर्थन करीत नाही, हे सिध्द करण्यासाठी संघ व भाजप ने ‘मनोहर भिडेंच्या राष्ट्रीय ध्वज – तिरंगा व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे विषयी केलेल्या निंदनीय वक्तव्यांचा तातडीने निषेध करावा.. अन्यथा अशा विकृत व देशद्रोही पैदाईश आपल्या आहेत असे देशवासियांना मानावे लागेल अशी प्रखर टिका काँग्रेस चे राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केली..!
“महात्मा गांधींच्या अहींसेच्या तत्वावर व नेतृत्वावर विश्वास ठेवुन, जीवन झोकुन देऊन हजारो स्वातंत्र्य सैनीकांच्या शहीदत्वातुन, नेहरू, पटेल, आझाद, बोस आदींच्या प्रदीर्घ संघर्षातुन मिळालेल्या ‘स्वातंत्र्याची व स्वातंत्र्य दिनाची’ निर्भत्सना करीत, १५ ॲागस्ट स्वातंत्र्यदिनी ‘दुखवटा पाळण्याचे’(?) अघटित व देश विरोधी आवाहन नुकतेच मनोहर उर्फ संभाजी भिडें नी केले होते..!
त्या नंतर पुनश्च देशाचे श्रध्दास्थान असलेल्या राष्ट्रपिता महात्मा गांधीवर तथ्यहीन, खोटे व विकृतजन्य आरोप व शिंतोडे ऊडवणाऱ्या कथित संभाजी ऊर्फ मनु भिडे यांचेवर राज्यातील भाजप नेतृत्वाच्या दावणीला बांधलेले तीन अर्धवट चाकांचे त्रिकुट सरकार’ हे भिडे प्रवृत्तीला पाठीशी घालत आहेत काय (?) असा संतप्त सवाल करून, त्रिकुट सरकारने तातडीने कारवाई करावी व निषेध ही करावा.. अन्यथा ‘भाजप नेतृत्वाच्या’ अधीन राज्यातील त्रिकुट सरकार देशद्रोही कृत्यात सामील आहे, असेच समजण्यात येईल असा इशारा देखील महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस तर्फे राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी दिला..
































