महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी (फलटण) : गणेश पवार
सातारा जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असून फलटण शहरासह तालुक्यातही कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात असून सदर वाढत्या प्रादुर्भाव लक्षात घेता व कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी सातारा यांनी सद्य स्थितीत लागू असलेले निर्बंध कडक केल्यामुळे या कडक निर्बंधाची अंमलबजावणी फलटण शहर पोलिसांकडून सुरू असून फलटण शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी करून विनाकारण चार चाकी व दोन चाकी वाहनांमध्ये फिरणाऱ्या ६७ वाहनांवर पोलिसांनी कारवाई केली असून सदरची वाहने आठ दिवसानंतर वाहन मालकांना मिळणार असून कोणीही वाहनांसाठी पोलीस स्थानकात येऊ नये व विनाकारण कोणीही बाहेर पडू नये तसेच प्रशासनाने दिलेल्या आदेशाचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन फलटण शहर पोलिसांनी नागरिकांना केले आहे.