महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी :शहाजीराजे भोसले( कळंब)
कळंब ( ता. इंदापूर ) येथील १५ दिवसांपूर्वी एका तरुणाचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता . त्यामुळे त्याच्या संपर्कात आलेल्यांचा शोध आरोग्य विभागाने व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सुरू करण्यात आला होता. बारामतीचे उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या आदेशानुसार पं .स . गटविकास अधिकारी विजयकुमार परिट , तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ. सुवर्णा पोळ , तालुका विस्तार अधिकारी दिलिप जगताप , वालचंदनगर पोलिस स्टेशनचे स.पो.नि. दिलीप पवार , प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाॅ.जीवन सरतापे , समुह वैद्यकीय अधिकारी डाॅ. संतोष पाटील , आरोग्य सेवक संदीप एकतपुरे , सेविका वैशाली राक्षे , ग्रामविकास अधिकारी घोगरे , आशा स्वंयसेविका व ग्रामपंचायतीचे कर्मचारी यांनी विशेष परिश्रमांतून गावाचा सर्व्हे करून , कळंबमधील कोरोना पॉझिटीव्ह आढळून आलेल्या रूग्णाच्या संपर्कातील कळंबमधील २ व परिसरातील १० जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविले होते , त्या सर्वांचे नमुने निगेटिव्ह आले होते .

पहिला सापडलेला रूग्ण बरा होवून घरी गेल्यानंतर दुसरे दिवशी नवीन पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आला होता , त्याच्या संपर्कातील ९ जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते , त्यापैकी २ जणांचे नमुने पॉझिटीव्ह आढळून आले आहेत .त्यामुळे रूग्ण संख्या ४ झाली होती त्यापैकी एकजण बरा होवून घरी गेला आहे व तीन जणांना कोव्हिड सेंटरमध्ये दाखल केलेले आहे . परिसरातील नागरिकांना यामुळे मोठा धक्का बसला असून , नागरिक प्रचंड भीती व तणावाखाली आहेत.
प्रशासनाने व वैद्यकीय सुत्रांनी नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घेणेचे आवाहन केले आहे.























