राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारक/ कुटुंब निवृत्ती वेतन धारकांना त्यांच्या मूळ निवृत्तीवेतन किंवा कुटुंब निवृत्तीवेतनाच्या एकूण रकमेवर 1 जुलै 21 पासून महागाई वाढीचा दर 17 टक्क्यांवरून 28 टक्के करण्यात आल्याचे शासनाने एका परिपत्रकाद्वारे कळविले आहे.
महागाई वाढीची रक्कम 1 आक्टोबर 21 पासून रोखीने द्यावयाची आहे. सदर वाढी मध्ये दि.1 जानेवारी 20, दि.1 जुलै 20 व दि.1 जानेवारी 21 पासून च्या मागाई वाढीचा समावेश आहे. मात्र दि. 1 जानेवारी 2020 ते 30 जून 21 या कालावधीत महागाई वाढीचा दर 17 टक्के इतकाच राहील असे कळविले आहे. दि.1 जुलै 21 ते 30 सप्टेंबर 21 या तीन महिन्याच्या कालावधीतील थकबाकी बाबत स्वतंत्रपणे आदेश काढण्यात येणार आहेत. 7ऑक्टोबर 21 रोजी हे परिपत्रक काढण्यात आले आहे.