सातारा : राष्ट्रवादीच्या येथील जिल्हा कार्यालयावर अज्ञातांनी गुरुवारी सकाळच्या वेळेत दगडफेक केली. यावेळी सरकारच्या विरोधात निषेधाच्या घोषणाही देण्यात आल्या. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या साताऱ्यातील निवासस्थाने देखील अज्ञातांनी गोवऱ्या पेटवल्या . पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी पोलिस फोर्स दाखल झाले
सुप्रीम कोर्टाने बुधवारी मराठा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर मराठा आरक्षणासाठी झगडणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. या पार्श्वभूमीवरच गुरुवारी राष्ट्रवादी कार्यालयावर दगडफेक झाल्याचे समजते.
दरम्यान या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अतिरिक्त जिल्हा अधिक्षक पोलीस अधीक्षक धीरज पाटील पोलीस फौज घेऊन राष्ट्रवादी कार्यालयात दाखल झाले. कार्यालयाला सुरक्षा देण्यात आली. मंत्री देसाई यांच्या निवासस्थानाबाहेर देखील कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे.
































