महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी : कराड पालिकेने तीन दशकापूर्वी बांधलेल्या छ. संभाजी महाराज भाजी मार्केटचा दुसरा मजल्यासाठी शासनाने 2 कोटी विकास निधीची तरतूद केली आहे. जनशक्ती आघाडीने सादर केलेल्या अर्थसंकल्पाच्या उपसुचनेत दिड कोटींची मागणी केली होती. जनशक्तीचे गटनेते राजेंद्रसिंह यादव, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती स्मीता हुलवान यांनी विशेष प्रयत्न केले. यानुसार वैशिष्ठ्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदानातून शासनाने दोन कोटींचा निधी मंजूर केला आहे.
छ. संभाजी महाराज भाजी मार्केट 1990 साली बाधण्यात आले. भाजी मंडईची वाढ लक्षात घेवून व भविष्यात मार्केट यार्ड परिसरातील लोकसंख्येचा विचार करून तत्कालीन नगराध्यक्ष ज्येष्ठ नेते. स्व.पी. डी. पाटील यांनी नव्या भाजी मार्केटची उभारणी केली. आता विस्तार जनशक्तीच्या काळात होत आहे. मध्यंतरी अनेक वर्षे भाजी मार्केट पडून होती. काही काळ तेथे घाऊक बाजार भरवला जातो होता. 2011 मध्ये मार्केट परिसरासाठी गुरूवारचा बाजार भरविला जातो होता. कोरोना काळात येथे विभागीय भाजी मंडई भरवली गेली. मात्र मार्केटचा दुसरा मजला होत नव्हता. यासाठी जनशक्तीचे गटनेते राजेंद्रसिंह यादव व महिला व बालकल्याण सभापती स्मिता हुलवान यांनी विशेष प्रयत्न केले.
पालिकेच्या यंदाच्या अर्थसंकल्पाच्या सुचनेला जनशक्तीने उपसुचना दिली. अनेक विकास कामे सुचवली. या कामात छत्रपती संभाजी भाजी मार्केटच्या दुसऱ्या मजल्यासाठी दिड कोटींच्या निधीची तरतूद करून निधी द्यावा, अशी मागणी केली होती. यानुसार शसानाने वैशिष्ठ्यपूर्ण कामासाठीच्या विशेष अनुदानातून दोन कोटींचा निधी मंजूर केला आहे.
जनशक्तीचे गटनेते राजेंद्रसिंह यादव म्हणाले, निधी मिळाला आहे. कोरोनानंतर कामावर लक्ष केंद्रीत करून मार्केटचा विस्तार करून सर्वसुविधा देणार आहोत. महिला व बालकल्याण सभापती स्मीता हुलवान म्हणाल्या, छ. संभाजी भाजी मार्केट प्राईम लोकेशनला आहे. तेथे अत्यंत चागंल्या दर्जाचे मार्केट होवू शकते. विस्तार करण्याचा आग्रह जनशक्तीचे गटनेते राजेंद्रसिंह यादव यांनी पालिका प्रसशासन, शासनाकडे धरला होता. दर्जेदार इमारत बांधण्याची जबाबदारीही जनशक्ती आघाडी पार पाडेल.




















