बीड(प्रतिनिधी)-करोना टाळेबंदी, सरकारचे धोरण व समाज माध्यमांचा वाढत्या प्रभावामुळे वृत्तपत्र व्यवसाय आर्थिक अडचणीत सापडला आहे. वृत्तपत्र क्षेत्राला आर्थिक स्थैर्य मिळावे यासाठी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी औरंगाबाद येथे राज्यातील पहिली संपादकांची गोलमेज परिषद घेऊन वृत्तपत्रांनी पारंपारिक धोरण बदलून अंकाची विक्री किंमत वाढवावी असे आवाहन केले होते. याला प्रतिसाद देत बीडमधील दैनिक झुंजार नेता आणि दैनिक कार्यारंभ वृत्तपत्रानी 1 नोव्हेंबर पासून विक्री किंमत दुप्पटीने वाढविली. दोन्ही संपादकांचा या धाडसी निर्णयाचे राज्य मराठी पत्रकार संघाने स्वागत केले असून इतर दैनिकांनी विक्री किंमत वाढवावी आणि वाचकांना दर्जेदार अंक देण्यासाठी प्रयत्न करावा असे आवाहन वसंत मुंडे यांनी केले आहे.बीड येथील दैनिक झुंजार नेता आणि दैनिक कार्यारंभ वृत्तपत्राने रविवार दिनांक 1 नोव्हेंबर 2020 पासून अंकाची विक्री किंमत चार रुपये केली. दोन्ही वृत्तपत्रांनी दुप्पटीने किंमत वाढवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. याबद्दल महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे अध्यक्ष वसंत मुंडे यांनी झुंजारनेता चे संपादक अजित वरपे व श्रीपती माने तर कार्यारंभचे संपादक शिवाजीराव रांजवण व बालाजी मारगुडे यांचा सत्कार करुन निर्णयाचे स्वागत केले. कोरोना टाळेबंदीमुळे वृत्तपत्र क्षेत्र अडचणीत आल्याने

राज्यभरात 30 हजार पेक्षा जास्त लोकांच्या हातचे काम गेले आहे. उत्पादन खर्चापेक्षा केवळ तीस टक्के विक्री किंमतीत घरपोहच सेवा देणारा वृत्तपत्र हा जगातील एकमेव व्यवसाय आहे. जाहिरातीच्या अतिरिक्त उत्पन्नातून तोटा भरून काढण्याचे आर्थिक धोरण या क्षेत्राने स्वीकारले. मात्र समाजमाध्यमांचा वाढता प्रभाव आणि उद्योग-व्यवसायाची दयनीय अवस्था लक्षात घेता जाहिरात मिळण्याचे प्रमाण खूप कमी झाले. परिणामी वृत्तपत्रांना उत्पादन खर्चातील तोटा भरुन काढणे कठीण झाल्याने आर्थीक अडचणीत भर पडली. सरकारने जाहीरात देण्याबाबतीत हात आखडता घेतल्याने या क्षेत्रासमोर टिकण्याचेच आव्हान उभे राहिले. यातून मार्ग काढण्यासाठी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी दोन महिन्यापासून वृत्तपत्रांनी आर्थिक धोरण बदलावे यासाठी चळवळ सुरू केली. राज्यभर विविध व्यासपीठावरुन वृत्तपत्रांनी पारंपरिक आर्थिक धोरण बदलून अंकाची विक्री किंमत वाढवावी व आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावे याची व्यवसायीक दृष्टीने मांडणी केली. औरंगाबाद येथे राज्यातील पहिली संपादक गोलमेज परिषद घेऊन भूमिकेला मूर्त रूप दिले. प्रमुख दैनिकांच्या संपादकांसह चाळीस संपादकांनी आर्थिक धोरण बदलण्याच्या भूमिकेचे स्वागत केले. तर दैनिक लोकपत्र चे संपादक रवींद्र तहकीक यांनी राज्यात सर्वप्रथम विजयादशमी पासून (दि. 25 ऑक्टोंबर 2020) अंकाची किंमत तीन रुपयांवरुन थेट सहा रुपये केली. तर रविवार दि.1 नोव्हेंबर पासून बीडमधील दैनिक झुंजार नेता व दैनिक कार्यारंभ या दैनिकांनीही अंकाची किंमत चार रुपये केली. इतर दैनिकांनीही किंमत वाढ करुन आर्थिक स्थैर्य मिळवण्यासाठी आणि वाचकांना गुणवत्तेचा अंक द्यावा यासाठी प्रयत्न करावा असे आवाहन वसंत मुंडे यांनी केले. यावेळी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष वैभव स्वामी, जिल्हा उपाध्यक्ष नागनाथ जाधव, आत्माराम वाव्हळ, शैलेश गोलांडे, इरफान शेख






















