संस्कार संपन्न सेवाव्रती शिक्षक -शिवाजीराव बळवंतराव देसाई
कराड तालुक्यातील आरेवाडी परंतु सध्या कराड मध्ये वास्तव्यास असलेले श्री शिवाजीराव बळवंतराव देसाई सर आपल्या पवित्र शिक्षण क्षेत्रात शिक्षक म्हणून ३१ मे २०२१ रोजी वयाच्या ५८ वर्षे पूर्ण करत आहेत .सेवानिवृतीच्या निमित्ताने श्री एस. बी. देसाई सरांविषयी श्री एस बी देसाई सर कराडच्या श्री शिवाजी विद्यालयातून ३१ मे २०२१ रोजी पर्यवेक्षक या पदावरुन सेवानिवृत होत आहेत सरांचे वडिल ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक व शिक्षक असल्याने लहानपणापासून त्यांच्यावर उत्तम संस्कार झाले .कोणत्याही संकटात खंबीरपणे उभे राहण्याचे संस्कार आई वडिलांनी सरांना दिल्याने सरांच्या आयुष्याला खरा आकार मिळाला . श्री शिवाजी विद्यालय कराड येथून माध्यमिक शिक्षण तर सदगुरु गाडगे महाराज काॕलेज कराड व छत्रपती शिवाजी काॕलेज सातारा येथे दहावी नंतरचे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले सातारच्या आझाद काॕलेज आॕफ एज्युकेशन मध्ये बी एडची पदवी संपादन केले .
समाजशास्त्र व मराठी विषयाची अध्यापन क्षेत्रातील पदवी घेऊन सरांनी सुरुवातीला गिरवी तालुका फलटण येथे अडीच वर्षे विनाअनुदानीत अध्यापक विद्यालयात प्राध्यापक म्हणून शैक्षणिक सेवेची सुरूवात केली.पुढे त्यांना कराडमधील शालेय शिक्षण घेतलेल्या आपल्याच शाळेत पूर्ण अनुदानीत शिक्षक पदावर काम करण्याची संधी मिळाली दि.१४/१०/१९९२ पासून सर श्री शिवाजी शिक्षण संस्था कराड येथे रूजू झाले सलग २८ वर्षे ७ महिने एवढा कालावधी पूर्ण करुन श्री एस बी देसाई सर सेवानिवृत होत आहेत माणसाचे व्यक्तिमत्व हे श्रेष्ठ जीवनमुल्य आहे .आपल्या शैक्षणिक सेवाकाळात सरांनी विद्यार्थ्याचे व्यक्तिमत्त्व परिपूर्ण करण्याचा अथक प्रयत्न केला .दैनंदिन अध्यापनाबरोबर विद्यार्थी स्पर्धा परीक्षेसाठी कसा तयार होईल याविषयी त्यांची धडपड असे विद्यार्थ्यांच्या मनातून स्पर्धा परीक्षेची भिती घालवण्यासाठी त्यांनी अनेक मुलांना शालाबाह्य परीक्षाना बसवले . त्यातुन अनेक मुलांना बाह्यपरीक्षांचा अनुभव आला ते समृद्ध झाले सरांना त्यांच्या कार्याची पोहोच देखील पुरस्काराने मिळाली अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर येथील शैक्षणिक संस्थेने त्यांना महात्मा फुले पुरस्कार व स्मृतीचिन्ह प्रशस्तीपत्र देऊन त्यांच्या कामाचा गौरव केला .
श्री एस बी देसाई सरानी विद्यालयात इतिहास / राज्य शास्त्र विषयाचे यशस्वी अध्यापन केले इ.१०वी च्या माध्यमिक शालांत परीक्षेत इतिहास / राज्यशास्त्र विषयाचे ssc बोर्डाचे परीक्षक नियामक व पुढे पेपर सेटर म्हणूनही यशस्वी जबाबदारी निभावली. आपल्या यशस्वी सेवा काळात सरांनी शालेय सहशालेय कार्यक्रमाच्या तसेच संस्थेच्या विविध कार्यक्रमाच्या बातम्या वेळोवेळी विविध वृत्तपत्रातून स्थानिक वृत्तवाहिन्यावरून प्रसारित करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. आपल्या विशेष कामाने ते सर्वांपर्यंत पोहोचले. शाळेच्या प्रसिद्धी विभागाचे ते प्रमुख राहिले. त्यांच्या संस्कारशिदोरीमुळे संपन्न झालेले अनेक विद्यार्थी समाजात आज विविध क्षेत्रात चमकत आहेत. 28 वर्षाच्या काळात सरांनी केलेल्या शैक्षणिक कार्याचा प्रवास सेवानिवृत्तीने जरी थांबला असला तरी आयुष्याचा सेवापूर्तीनंतरचा दुसरा टप्पा मार्गदर्शनाचा असतो. हे मार्गदर्शन श्री.एस. बी. देसाई सर नक्कीच पूर्ण करतील. सरांना व त्यांच्या कुटुंबियांना सेवानिवृत्तीनंतरचा काळ आनंदी , समाधानी निरामय निरोगी व दीर्घायु जावो याच शुभेच्छा. श्री शिवाजी विद्यालय कराड. श्री शिवाजी शिक्षण संस्था ट्रस्ट. महाराष्ट्र राज्य