सातारा दि. 8:, सातारा जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष शेख्रर सिंह यांनी सातारा जिल्ह्यातील सेतू केंद्र, आधार केंद्र, चार्टर्ड अकौंटंट कार्यालये या आस्थापनांना सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यत चालू ठेवणेस परवानगी दिली आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविदयालये, कोचिंग क्लासेस पुर्णपणे बंद राहतील तथापि, वैद्यकीय महाविदयालये व नर्सिंग कोसेर्स चालू चालू ठेवण्यास परवानगी दिली आहे. याबाबतचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. कोरोनाच्या अनुषंगाने निर्गमित अटी व शर्तींचे पालन न करता भंग करणाऱ्या व्यक्तींना 1000 इतका दंड व संबंधित आस्थापनांना 10 हजार दंड आकारण्यात येईल असे आदेशात नमुद आहे.