ब्रेकिंग न्युज……
महाराष्ट्र न्युज प्रतिनिधी : संतोष सुतार
औंध पोलिस ठाण्यात पोक्सो अंतर्गत दाखल असलेल्या गुन्ह्याच्या तपासात मदत करण्यासाठी दाखल असलेल्या आरोपीचा तक्रारदार भाऊ यांच्याकडे सव्वा लाखाची मागणी करण्यात आली होती. तडजोडी अंती पन्नास हजाराची लाच रंगेहात घेताना खाजगी इसम सुशांत वरुडे व पोलीस हवालदार शिंदे यांना आज दुपारी सातारा लाच लुचपत प्रतिबंध विभागाने ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.