
विकास सेवा सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत स्थानिक कार्यकर्त्यांच्या सहकार शेतकरी विकास पॅनलने आमदार जयकुमार गोरे पुरस्कृत श्री.महालक्ष्मी शेतकरी विकास पॅनलचा धुव्वा उडवत सर्वच्या सर्व १३-० अशी एकहाती सत्ता काबीज केल्यानंतर ९ मार्च रोजी सोसायटीच्या इमारतीत अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची निवडसभा संपन्न झाली.यावेळी विजय चव्हाण,मोतीराम तोरणे,सर्जेराव शिंदे,नाना शिंदे,साहेबराव शिंदे,मामा शिंदे, महादेव शिंदे,भागवत शिंदे,जगन्नाथ तायाप्पा शिंदे,अनुसया शिंदे,मंगल शिंदे, आदी संचालक उपस्थित होते.यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी सुशिलकुमार कांबळे आणि सोसायटीचे सचिव हणमंत नरळे यांनी काम पाहिले.निवडीनंतर नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे सरपंच जयश्री नानासाहेब शिंदे,उपसरपंच चांगुना शिंदे,माजी सरपंच दत्तात्रय शिंदे,संभाजी शिंदे,डॉ.नानासाहेब शिंदे,माजी अध्यक्ष पोपट शिंदे,शिवाजी शिंदे,राजाराम तोरणे सर,उद्योजक नानासो शिंदे,उत्तम चव्हाण,विठ्ठल शिंदे,विद्याधर चव्हाण सर,किसन नरळे,बापू नरळे,टी.एम.शिंदे,राजू तुपे,दिनकर शिंदे,आर.बी.नरळे या मान्यवरांचे मान्यवरांनी अभिनंदन केले.
निवडीनंतर विजयी निशाणी दाखवताना सहकार शेतकरी विकास पॅनलच्या संचालकासह समर्थक…
































