” विज ग्राहकांची कनेक्शन खंडित केल्यास तिव्र आंदोलनाचा दिला इशारा “
लोणंद : कोविड 19 च्या महामारीत अनेकांवर बेरोजगारी व उपासमारीची कुर्हाडच कोसळली असताना सातारा जिल्ह्याने तिसर्या वर्गवारीत नुकताच प्रवेश केल्याने मा. जिल्हाधिकारी सो. सातारा यांनी सोमवार ते शुक्रवार सकाळी 09 ते सायंकाळी 04 असा कालावधी उद्योग व्यवसाय करण्यासाठी दिला आहे. यामुळे अनेक छोटे मोठ्या व्यवसायीक बांधव कुटुंब उदरनिर्वाह सोबत उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवल उपलब्ध करण्यासाठीची धडपड सुरू असताना विज महावितरण कंपनीच्या वतीने विज ग्राहकांना थकित वीज बिल वसुलीसाठी जोरदार मोहीम सुरू केल्याने थकबाकीदारांची थेट विज कनेक्शन खंडित करुन थकबाकी वसूल करण्यासाठी दबाव तंत्राचा वापर करून दुष्काळात तेरावा महिना उक्तीप्रमाणे सर्व सामान्य नागरिकांवर अन्यायच सुरू झाला आहे, सर्व सामान्य जनतेवर सुरू असलेल्या अन्यायाविरुद्ध साथ प्रतिष्ठाण वतीने आवाज उठविण्यात येवून कोविड 19 च्या महामारीत जन हिताचा निर्णय होऊन घरगुती व व्यवसायीक विज ग्राहकांची विज खंडित न करता सवलत देण्यात यावी, उपासमारी व महामारीत विज कनेक्शन खंडित केल्यास तिव्र आंदोलन उभारावे लागेल असे निवेदन साथ प्रतिष्ठाण चे अध्यक्ष कय्युम मुल्ला व खजिनदार सचिन चव्हाण यांनी गृह शाखा नायब तहसीलदार मा. उभारे साहेब यांचे मार्फत मा.जिल्हाधिकारी सो. सातारा यांना देण्यात आले.