महाराष्ट्र न्यूज इंदापूर प्रतिनिधी : शहाजीराजे भोसले
राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी काटी गावातील गुळवे व आरडे कुटुंबियांची गुरुवारी (दि.८) भेट घेऊन सांत्वन केले.
काटी येथील प्रसिद्ध व्यापारी औदुंबर दगडू गुळवे (वय-६३ वर्षे) यांचे ह्रदय विकाराच्या तीव्र झटक्याने (दि.४) निधन झाले. त्यांच्या पाठीमागे पत्नी, पाच भाऊ, दोन मुले, एक विवाहित मुलगी असा मोठा परिवार आहे.यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी गुळवे परिवाराचे सांत्वन केले.आजही गुळवे परिवारामध्ये एकत्र कुटुंब पद्धती अस्तित्वात आहे. या भेटी प्रसंगी पं.स.चे माजी सभापती विलासराव वाघमोडे यांचेसह नीरा नीरा-भीमा कारखान्याचे माजी संचालक मोहन गुळवे, डॉ.गुळवे व कुटुंबीय उपस्थित होते.
तसेच काटी येथील महेश चंद्रकांत आरडे हे नीरा-भीमा कारखान्यामध्ये टेलिफोन ऑपरेटर म्हणून कार्यरत होते. त्यांचे (दि. २५) निधन झाले.त्यांचे पाठीमागे आई,वडील, पत्नी,एक मुलगी, एक मुलगा असा परिवार आहे. हर्षवर्धन पाटील यांनी चंद्रकांत आरडे व कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी त्यांनी महेशच्या कामाचे कौतुक केले.याप्रसंगी पं.स.चे माजी सभापती विलासराव वाघमोडे, बंडू साठे आदी उपस्थित होते.