महाराष्ट्र न्युज कराड प्रतिनिधी. :
सिक्कीम राज्याचे माजी राज्यपाल व सातारा लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार श्रीनिवास पाटील यांचा उद्या शनिवार दिनांक ११ फेब्रुवारी रोजी ८२ वा वाढदिवस साजरा होत आहे. वाढदिवसानिमित्त खा. श्रीनिवास पाटील हे शुभेच्छा स्वीकारण्यासाठी गोटे ता. कराड येथे उपस्थित राहणार असल्याची माहिती त्यांच्या संपर्क कार्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे.
खा. श्रीनिवास पाटील यांचा वाढदिवस कराड येथे साधेपणाने साजरा होणार आहे.
खा. पाटील हे शनिवारी सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत गोटे ता. कराड येथील त्यांच्या लोकसेवा जनसंपर्क कार्यालयात उपस्थित राहून हितचिंतक व कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारणार आहेत. शुभेच्छा देण्यासाठी हार, तुरे, पुष्पगुच्छ न आणता विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य आणावे अथवा समाज उपयोगी उपक्रम राबवावे असे आवाहन त्यांच्या संपर्क कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे. दरम्यान त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध ठिकाणी सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.






















