महाराष्ट्र न्यूज फलटण प्रतिनिधी गणेश पवार :
पूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिलेली तालुक्यातील श्रीराम, श्रीदत्त इंडिया,स्वराज साखर कारखाना व शेती महामंडळ या चार युनिटसाठी होऊ घातलेली निवडणूक प्रक्रिया सातारा औद्योगिक न्यायालयाने पुढील सुनावणीच्या तारखेपर्यंत स्थगित ठेवण्याचा आदेश दिले आहे.गत महिन्यापासून फलटण तालुका साखर कामगार युनियन यांनी या चार युनिट मधून कौन्सिल मेंबर यांची यादी जाहीर केली होती व दिनांक १४ ऑगस्ट रोजी पदाधिकाऱ्यांच्या निवडीसाठी बैठक बोलावली होती या निवडणुकीच्या विरोधात मागील कार्यकारिणीच्या सभासदांनी औद्योगिक न्यायालय सातारा या ठिकाणी याचिका दाखल केली होती त्या याचिकेवर सुनवाई करताना न्यायालयाने पुढील तारखेपर्यंत साखर कामगार युनियनची कोणतीही निवडणूक घेऊ नये असा आदेश दिला आहे न्यायालयाच्या या आदेशामुळे पूर्ण निवडणूक प्रक्रिया स्थगित झाली आहे.






















