भारतीय जनता पार्टी सातारा तर्फे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करणाऱ्या राज्यशासनाचा जाहीर निषेध करण्यात आला आणि त्या संबंधीचे निवेदन,भाजपा सातारा जिल्हाध्यक्ष विक्रमजी पावसकर यांच्या मार्फत जिल्हाधिकारी साहेब सातारा जिल्हा सातारा यांना देण्यात आले.
निवेदनात म्हणाले आहे की, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना राज्य सरकारने अटक केली असून सदर अटक ही पूर्णपणे राजकीय सुडबुध्दीने करण्यात आली आहे.
भाजपाच्या जनादेश यात्रेला मिळत असलेल्या प्रतिसादामुळे ठाकरे सरकारच्या पायाखालची वाळू सरकली आहे आणि त्यामुळे अगोदरच दोन ते तीन दिवस जनादेश यात्रेच्या विरुद्ध मुंबई मध्ये ४०च्या आसपास गुन्हे दाखल करण्यात आले. याचाच पुढचा सुडाचा अध्याय म्हणून कायद्याला धाब्यावर बसवून आणि पोलीस यंत्रणेला हाताशी धरून बेकायदेशीरपणे ही अटक करण्यात आली. त्यांना जरी न्यायालयाने जामीन दिला असला तरी पोलीस प्रशासनास दमदाटी करून ठाकरे सरकारने केलेल्या भ्याड कृत्याचा,अटक सत्राचा,या घटनेचा भारतीय जनता पार्टी तर्फे तीव्र निषेध करण्यात आला,तसेच भारतीय जनता पार्टीच्या विविध ठिकाणच्या कार्यालयावर हल्ला करणाऱ्या समाजविधातक शक्तींना वेळीच अटकाव करावा त्यांच्यावर कारवाई करावी अशी विनंती करण्यात आली आणि महाराष्ट्र राज्य कायदा , सुव्यवस्थेचा धरून चालवण्याची सुबुद्धी राज्य सरकारला येवो अशी प्रार्थना सुद्धा निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे निवेदनाची प्रत माहिती आणि कार्यवाही साठी राज्यपाल महोदय महाराष्ट्र राज्य यांना पाठवण्यात आली आहे.
या वेळी सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी, जिल्हा सरचिटणीस विट्ठल बलशेटवार, जिल्हा उपाध्यक्ष ऍड प्रशांत खामकर, जिल्हा उपाध्यक्ष राहुल शिवनामे, माजी जिल्हा उपाध्यक्ष रवी पवार,सातारा शहर सरचिटणीस प्रवीण शहाणे, सातारा शहर सरचिटणीस विक्रांत भोसले, वैद्यकीय आघाडी जिल्हाध्यक्ष डॉ उत्कर्ष रेपाळ, औद्योगिक आघाडी जिल्हाध्यक्ष निलेश शहा, सातारा शहर चिटणीस रवी आपटे, ओ बी सी मोर्च्या युवती जिल्हा अध्यक्ष वनिता पवार, महिला मोर्च्या सातारा शहर सरचिटणीस हेमांगी जोशी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.