सातारा:जिल्हा परिषद आरोग्य विभागामध्ये बाह्य यंत्रने मार्फत कंत्राटी पदाची भरती केली जाते. सदरचे बाह्य यंत्रणा ही मुळ नाशिक जिल्हयातील असून त्याचे उपकंत्राट सातारा जिल्ह्यातील एका खाजगी ठेकेदाराला दिले असून मागील पाच वर्षांपासून सदरचा ठेकेदार हा कंत्राटी कर्मचाऱ्यांची पिळवणूक करून त्यांचे आर्थिक शोषण करत आहे या बाबतच्या अनेक तक्रारी कंत्राटी कर्मचारी यांनी केलेल्या होत्या मात्र जिल्हा परिषद मधील अधिकाऱ्यांच्या वरदहस्तमुळे सदरच्या ठेकेदारावर तसेच त्यांच्या संस्थेवर कोणत्याही प्रकरची कारवाई होताना दिसत नाही. सदर ठेकेदाराला जिल्हा परिषद आरोग्य विभागामधील बड्या अधिकाऱ्यांचे वरदहस्त असल्याने व त्यांचे हात ओले असल्यामुळे सदरच्या संस्थेवर कोणतीही करवाई होताना दिसत नाही. सदरच्या ठेकेदाराकडून कंत्राटी कामगारांना किमान वेतन कायद्यांतर्गत शासनाने ठरवून दिलेले वेतन न देता सात ते आठ हजार वेतन संबधित कर्मचाऱ्यांच्या हातात टेकवले जाते व पूर्ण पगाराच्या रजिस्टर वर खोट्या सह्या घेतल्या जातात तसेच बाकीचे वेतन ठेकेदार हा स्वतः कमिशन पोटी महिन्याला घेत असतो.
याबाबत कामगारांनी आवाज उठवला तर कामावरून काढून टाकण्यात येते. वेतन उशिरा देणे तसेच काही जणांचे वेतन कॅश मध्ये दिले जाते तर काही जणांचे बँक खात्यामध्ये. कामगारांना कोणत्याही प्रकारची विमा पॉलिसी नाही, भविष्य निर्वाह निधी कटिंग केला जात नाही. योग्य सोई सुविधा दिल्या जात नाही, सुरक्षेच्या दृष्टीने साधने पुरवली जात नाहीत, शैक्षणीक पात्रता नसताना सुद्धा टेक्निकल काम दिले जाते तसेच आरोग्य सहायक चे शिक्षण पात्र नसताना ते काम दिले जाते त्यामुळे या सर्वाची चौकशी करण्यात यावी तसेच याबाबत मागील तीन वर्षांमध्ये आलेल्या तक्रारी व त्याबाबत झालेल्या चौकशी काय झाले?
गरीब गरजू कंत्राटी कामगारांच्या तोंडातील घास काडणाऱ्या अश्या मुजोर कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकून सदरचे कंत्राट तत्काळ रद्द करावे अशी आग्रही मागणी बहुजन मुक्ती पार्टी चे जिल्हा अध्यक्ष तुषार मोतलिंग यांनी सातारा जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्र्वर खिलारी यांच्याकडे केली आहे.
कंत्राटी कर्मचाऱ्यांवर शासनाकडून व ठेकेदाराकडून जी वेटबिगारीची वागणूक दिली जात आहे ती पूर्णपणे माणुसकीला काळीमा फासणारी आहे अशा प्रशासन आणि ठेकेदाराचा आम्ही निषेध करतो.-एकनाथ सपकाळ(माजी जिल्हा उपप्रमुख शिवसेना)
कंत्राटी कर्मचारी म्हणजे रोजगार हमी वरचा कर्मचारी नाही तो एक सुशिक्षित सुज्ञ होतकरू युवा वर्ग आहे त्यामुळे अश्या युवकांना वेटबिगर म्हणून राबवत असतील तर आम्हाला या विरोधात जन आंदोलन करणार तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कारवाई नाही केली तर त्यांच्या विरोधात सुद्धा तीव्र आंदोलन करणार.
अरुण पवार – (जिल्हा कार्याध्यक्ष भीमशक्ती)
































