सुरगाणा ; अनुसूचित जमाती कल्याण समितीची तालुक्यात भेट देऊन विविध कामांची पाहणी केली. पेठ येथून दौरा आटोपून दुपारी तीन वाजेच्या सुमारास तालुक्यात आगमन झाले या दौऱ्यात अनुसूचित जमाती विधीमंडळ समितीत दौरा समितीचे अध्यक्ष दोलत दरोडा, निवास वनगा,किरण सरनाईक यांचा समावेश होता. या समितीचे माजी आमदार जिवा पांडू गावित यांनी कार्यकर्त्यां समवेत हस्ते फाटा येथे आगमन होताच पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
समितीने तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय बाऱ्हे येथे रुग्णालयात भेट देऊन रूग्णांची विचारपुस केली.औषध साठ्यांची तपासणी करत दरमहा महिला प्रसुती संख्या, सर्पदंश,अपघात किती झाले.स्थानिक पातळीवर उपचार, व नासिकला किती रुग्ण पाठविले.ताप,चिकनगुणीया, मलेरिया,कावीळ या आजाराची विचारपुस केली.
तदनंतर खोबळा येथील नार नदिवर माजी आमदार गावित यांनी प्रायोगिक तत्त्वावर बांधण्यात आलेल्या सिमेंट प्लग साठवण बंधाऱ्याची पाहणी करत केवळ एकोणीस लाख रुपये किंमतीचा बंधारा वेगळे तंत्रज्ञान वापरून अंदाजे चार कोटी रुपयांची किंमतीचे काम केल्याने समितीने पाहणी करून गावित यांनी केलेल्या कामाचे कौतुक केले.आठ वाजेच्या दरम्यान समितीने तहसिल कार्यालयात भेट देऊन कामकाजाचा थोडक्यात आढावा घेतला. यावेळी उपोषणार्थींनी खुंटविहीर व भवाडा ग्रामपंचायतीत झालेल्य भ्रष्टाचार चौकशीचे निवेदन सादर केले. उपसभापती इंद्रजित गावित यांनी प्रतिनियुक्तीवर इतरत्र असलेले कर्मचारी यांची प्रतिनियुक्ती रद्द करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली. महाराष्ट्र राज्य आदिवासी बचाव अभियानचे केंद्रीय प्रतिनिधी रतन चौधरी यांनी पांगारणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील समस्या व ग्रामीण रुग्णालय मंजूर करण्यात यावे, मालगोंदे येथील लघु सिंचन योजना मंजूर करावी, पिंपळसोंड येथील तातापानी गरम पाण्याचे झरे, साखळचोंड येथील पाच नयनरम्य धबधबे यांचा विकास करुन पर्यटनाला चालना द्यावी, तातापानी येथे वनविभागाने नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या दुर्मिळ वनौषधींचे संवर्धन व जतनासाठी वनौषधींचे उद्यान उभारण्यात यावे, अतिदुर्गम पिंळसोंड येथे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करण्यात यावे, उंबरपाडा(पिं) येथील पारधी वस्तीवर पंतप्रधान ग्राम सडक योजना रस्ता मंजूर करण्यात यावा,पिंपळसोंड येथील आदिवासी संस्कृतीचे कलाकार शिवराम चौधरी यांना भोवाडा, रामलीला उत्सवाचे मुखवटे संग्रहा करीता” आदिवासी सांस्कृतिक भवन” मंजूर करण्यात यावे.अशा प्रकारचे विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आली.
यावेळी महाराष्ट्र राज्य आदिवासी प्राथमिक शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष अध्यक्ष पांडुरंग पवार, रतन चौधरी, सुधाकर भोये, भास्कर बागुल, हरियाणा गावित यांच्या हस्ते समितीतील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कोरोना काळात आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ अलंगुण तसेच शिक्षक, ग्रामसेवक, कृषी सहायक, महसूल विभाग, पंचायत समिती,तसेच सामाजिक क्षेत्रातील मान्यवर गोपाळ वैष्णव, गवळी, ज्योती जाधव, आधार मैत्री फाउंडेशन यांनी मदतीचा हात पुढे करीत लाखो रुपयांचा निधी जिल्हा परिषदेचे शिक्षक रतन चौधरी, ग्रामसेवक वसंत भोये, तत्कालीन तहसीलदार किशोर मराठे यांच्या नेतृत्वाखाली निधीचे संकलन करून कोरोनाच्या सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्याने अनुसूचित जमाती कल्याण समितीने केलेल्या कामाची प्रशंसा करीत स्तुती सुमने उधळत तालुका वासियांचे दुसऱ्या लाटेवर केलेली मात याचे तोंडभरून कौतुक केले. समितीचे अध्यक्ष आमदार दौलत दरोडा यांनी या निवेदनाची निश्चितच दखल घेऊन आदिवासी भागातील समस्या सोडविण्यास प्राधान्य देण्यात येईल असे आश्वासन दिले.
यावेळी एन.डी. गावित, उत्तम कडू, प्रांतअधिकारी विकास मीना,तहसिलदार विजय सुर्यवंशी, नायब तहसीलदार राजेंद्र मोरे, गटविकास अधिकारी दिपक पाटील, गटशिक्षणाधिकारी धनंजय कोळी, कृषी अधिकारी प्रशांत रहाणे,तालुका आरोग्य अधिकारी डाॕ.दिलीप रणवीर, बालविकास प्रकल्प अधिकारी भिंगारे,विस्तार अधिकारी रामचंद्र झिरवाळ, के. के. गायकवाड, पोलिस निरीक्षक दिवानसिंग वसावे, सागर नांद्रे, वन अधिकारी सुरेश गवारी, उपसभापती इंद्रजित गावित, सुभाष चौधरी, वसंत बागुल, भिका राठोड, मंदाकिनी भोये त्र्यंबक ठेपणे, आनंदा चौधरी,बाऱ्हे पोलीस ठाणे सहा.पो .निरि.राजेंद्र लोखंडे,तलाठी भदाणे,बाऱ्हे ग्रामसेवक,ग्रामीण रूग्णालय बाऱ्हे वैद्यकीय अधिकारी डाॕ.देवानंद चौधरी,डाॕ.स्नेहल धुम,डाॕ.विजय साठे,देविदास गावीत,नामदेव पाडवी,मा.सरपंच गोपाळराव धुम,युवराज जाधव,मनोज देशमुख,सुरेश महाले,पो.पा.हंसराज खंबाईत,सुरेश पवार,गुलाब भडांगे,आरोग्य,वनविभाग कर्मचारी तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते.