महाराष्ट्रातील 366 तहसीलवर एकाच दिवशी धरणे आंदोलन
महाराष्ट्र न्यूज़ इंदापूर प्रतिनिधी : मयुर देवकर
ऐतिहासिक बौद्ध स्तूपांचे संरक्षण,संवर्धन व हस्तांतरण संदर्भात बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क इंदापूर युनिट च्या वतीने प्रशासकीय भवन येथे एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.या संदर्भात राज्यस्तरीय चरणबद्ध आंदोलन सुरू असून दि.12 ऑक्टोंबर रोजी दुसर्या चरणात एकाच दिवशी महाराष्ट्रातील 366 तहसीलवर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.
भारताची जागतिक स्तरावर बौद्ध जन्मस्थळ व कार्यस्थळ म्हणून ओळख असून बौद्ध संस्कृतीचा देश अशी सत्य स्वरूपाची मान्यता आहे.सम्राट अशोक व अन्य बौद्ध सम्राटांनी अनेक स्तूप व विहाराची रचना केली असून ती आमची ऐतिहासिक धरोहर आहे अशा आशयाचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले असून पुढील मागण्यांच्या संदर्भात राज्यभरात आंदोलन सुरू आहे.
1. भोन ता, संग्रामपुर जि. बुलढाणा येथील स्तुपाचे संवर्धन, जतन व मौर्यकालीन बुद्धस्तूपाच्या जमीनिवर जिगाव धरण प्रकल्प हेतुपूर्वक उभा करणे म्हणजे ती विरासत नष्ट करने आहे म्हणून त्या स्तुपाला व 45 एकर जागेत असलेल्या बौद्ध विरासतीला वाचविणे.2. तेर अर्थात तगर जि. उस्मानाबाद येथील सातवाहन व मौर्यकालीन वास्तुचे जे बौद्धस्तूप आहे त्याचे जतन, संवर्धन व देखभाल करण्यासाठी बुद्धिस्ट इंटरनेशनल नेटवर्क कडे हस्तांतर करणे.3. अडम, ता. कुही जि.नागपूर येथील अमोंदनाथ, यांचे सर्वेनुसार मौर्यपूर्व काळातील स्तुपांचे संवर्धन करणे.4. पवनी जि. भंडारा हेन्टी कुझिन्स यांचे 1857 चे संशोधनानुसार येथील बौद्धकालीन स्तूपांचे संवर्धन, संगोपन करणे.5.अकोला जिल्हयातील पातुर ते बाळापुर रोडवरिल दोन बौद्धविहारांचे जतन व संवर्धन करणे.6. त्रिरश्मी लेनी जि. नाशिक या लेणिवरील इतर लोकांचा कब्जा काढून घेवून बौद्ध स्तूपाचे संवर्धन करणे.7. कार्ले लेणीचे संवर्धन व संगोपन करणे.8.सोपारा येथील बौद्ध लेणीवर बिल्डर्स लोकांनी कब्जा केला आहे तो हटवून त्या लेणीचे संवर्धन करणे. 9.वरील सर्व ऐतिहासिक ठेवा जपण्यासाठी व संवर्धनासाठी उपरोक्त कायदयानुसार BIN कडे देणे व त्याला पर्यटनाचा जागतिक ‘अ दर्जा देणे.
या प्रमुख मागण्यांसाठी एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.यावेळी बहुजन मुक्ती पार्टी चे राष्ट्रीय महासचिव अँड.राहुल मखरे,भारत मुक्ती मोर्चा पुणे जिल्हाध्यक्ष संजय शिंदे, भारत मुक्ती मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष नानासाहेब चव्हाण, भारतीय युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सुरज धाईंजे, बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क पुणे जिल्हा उपाध्यक्ष किशोर धाईंजे,आझाद सय्यद, इम्रानभाई बागवान, अण्णा चव्हाण, विशाल लोंढे, गणेश चंदनशिवे, मयूर वाघमारे, तानाजी आहेर, सुनील कांबळे, बाळू गायकवाड, अनिल सिद्धापुरे,अनिल भगत,भीमराव वाघमारे, बाळू गायकवाड व अन्य उपस्थित होते.