म्हसवड प्रतिनिधी : मुर्दाबाद, मुर्दाबाद, नारायण राणे मुर्दाबाद, कोंबडी चोर कोंबडी चोर, नारायण राणे कोंबडी चोर , धिक्कार असो, धिक्कार आसो नारायण राणेंचा धिक्कार असो, जिंदाबाद जिंदाबाद शिवसेना जिंदाबाद… अशा घोषणा देत माण तालुक्यातील शिवसैनिकांनी मोर्चा काढून दहिवडी पोलिस ठखण्यासमोरच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उध्दवजी ठाकरे यांचे विषय अपशब्द बोलल्या प्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी यांच्या निषेधाच्या घोषणा देत त्यांच्या प्रतिमेला जोडेमारुन फोटोचे दहण शिवसेनेच्या वतीने करण्यात आले मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा जाहीर निषेध करत त्यांच्या फोटोस जोडेमारो आंदोलन करुन तातडीने त्यांना अटक करण्याची मागणी तहसीलदार व दहिवडी पोलिसांना मोर्चा काढून निवेदन देण्यात आले.
शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख संजय भोसले, माण तालुकाप्रमुख बाळासाहेब मुलाणी, म्हसवड शहराध्यक्षा राहुल मंगरुळे यांचे नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले या वेळी सहायक पोलिस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांना निवेदन देण्यात आले.
या वेळी सुभाष काटकर, अमित कुलकर्णी, प्रवीण कट्टे, सुनील मगर,महादेव काळुखे, संभाजी जगदाळे, संदीप जाधव, वैभव गोसावी, नीतेश गोसावी, प्रवीण भोसले, सूरज जाधव, गणेश गोसावी, लखन जाधव, प्रवीण गोसावी, सोनू मदने आदी शिवसैनिक उपस्थित होते.