न्यू इंग्लिश स्कूल ने सीमेवरील सैनिकांना तयार केलेल्या राख्यांची भेट
सातारा ; डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणे च्या न्यू इंग्लिश स्कूल सातारा या शाळेने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी एक ऑगस्ट ते सहा ऑगस्ट या कालावधीत ऑनलाईन पध्दतीने विद्यार्थी व पालक यांच्यात राखी बनवायची कार्यशाळा घेण्यात आली. शाळेतील कलाशिक्षक घन:श्याम नवले व संदीप माळी सर यांनी संस्थेच्या टीम ॲप द्वारा ऑनलाइन पद्धतीने मार्गदर्शन केले.
शाळेतील कलाशिक्षक यांनी मार्गदर्शन करताना टाकाऊतून टिकाऊ आपल्या घरांमध्ये वापरात नसलेल्या विविध मण्यांच्या माळा ,लोकर , विविध धागे ,विविध प्रकारचे कागद इत्यादीचा वापर करून उत्तम राखी कशी बनवता येईल हे प्रात्यक्षिकाद्वारे विद्यार्थी व पालक यांना ऑनलाइन व्हिडिओ द्वारे दाखवण्यात आले. त्यानुसार रक्षाबंधनानिमित्त शुभेच्छा संदेश पत्र व पर्यावरण पूरक राखी बनवण्याचे आवाहन करण्यात आले व त्यांना कृतीद्वारा राख्या बनवण्याचे व्हिडीओ दाखवून विद्यार्थी व पालक यांच्याकडून उत्तम राख्या बनवून घेतल्या. विद्यार्थी व पालक यांनी देखील पर्यावरण पूरक-थर्माकोल व प्लास्टिक याचा कुठे वापर न करता आकर्षक व उत्कृष्ट अशा राख्या बनवून त्या शाळेत जमा केल्या. तसेच राखीव बनण्यासाठी खूप कमी खर्च येत असतो याची विद्यार्थी व पालक यांना जाणीव करून देत यातूनच बाजारात आपण राख्या जास्त किंमतीने विकत घेतानाचा होणारा घरातील खर्च टाळावा आणि आपण केलेल्या राख्या राखी पौर्णिमेला वापरण्याचे आवाहन शाळेमार्फत करण्यात आले.
गरीब आणि होतकरू विद्यार्थी पालक यांनी राख्या बनवून स्वकमाई करण्याचे देखील आवाहन शाळेतील कलाशिक्षक यांनी ऑनलाइन पद्धतीने मार्गदर्शन केले व त्यानुसार काही विद्यार्थी पालक यांनी अनेक राख्या बनवून त्याची विक्री करून स्वकमाई सुद्धा करत असल्याचे पालकांकडून तसे संदेश येत आहेत .
भारतीय स्वातंत्र्य दिनाला 75 वर्ष पूर्ण झालेले असल्यामुळे अमृतमहोत्सवी वर्षनिमित्त विद्यार्थी व पालक यांच्या मनामध्ये देशाबद्दल प्रेम भावना वृद्धिंगत व्हावी या हेतूने आपल्या देशरक्षणासाठी अहोरात्र सीमेवर झटणारे सैनिक यांना आपण केलेल्या राख्या पाठवण्यासाठीची संकल्पना शाळेचे मुख्याध्यापक सुनील शिवले सर यांनी मांडली .त्यानुसार पुण्यातील सरहद्द संस्था पुणे यांचेमार्फत शाळेने बनवलेल्या 595 राख्या 7ऑगस्ट 2021 रोजी शालाप्रमुख यांच्या मार्फत सरहद्द संस्थेचे संचालक अनंत सराफ यांचेकडे शाळेच्या माजी विद्यार्थीनीमार्फत सुपुर्त करण्यात आल्या आणि त्या सीमेवरील सैनिकांना राख्या पोहोच झाल्याचे देखील संदेश आलेला आहे. अशाप्रकारे न्यू इंग्लिश स्कूल सातारा या शाळेने आपल्या देशाबद्दलचे प्रेम भावना राख्या तयार करून सैनिकांना पाठवले आहेत अशा या नाविन्यपूर्ण उपक्रमाबद्दल विविध सामाजिक व शैक्षणिक स्तरातून विद्यार्थी पालक व कलाशिक्षक यांचे व शालामाऊलीचे कौतुक होत आहे.
या पर्यावरणपूरक राखी बनवण्याच्या कार्यशाळेसाठी शाळेतील पदाधिकारी कलाशिक्षक व सर्व वर्गशिक्षक यांचे सहकार्यातूनच हा उपक्रम यशस्वी पार पडला. याबद्दल न्यू इंग्लिश स्कूल चे चेअरमन अमित कुलकर्णी सर ,शालेय समिती सदस्य अनंत जोशी सर ,मुख्याध्यापक सुनील शिवले व शालेय पदाधिकारी यांनी विशेष कौतुक व अभिनंदन केले.