सुनील निंबाळकर / पुणे : दिनांक ४/७/२०२१ रोजी रात्री १०.०० वा.च्या सुमारास पाटस तामखडा येथील भानोबा मंदिराचे समोर महेश उर्फ मन्या भागवत याने शिवम शितकल यास फोनवरुन आई बहिणीवरुन शिव्या देवून तामखडा येथे बोलविलेवरुन शिवम संतोष शितकल वय २३ वर्षे व गणेश रमेश माकर वय २३ वर्षे दोघे रा.पाटस अंबिकानगर ता.दौंड जि.पुणे हे शिव्या का दिल्या याचा जाब विचारणेसाठी गेले असता तेथे आरोपी नामें महेश उर्फ मन्या संजय भागवत , महेश मारुती टुले रा.पाटस, तामखडा ता.दौंड जि.पुणे व त्याचेसोबतचे अनोळखी ४ ते ५ साथीदार यांनी शिवम संतोष शितकल वय २३ वर्षे व गणेश रमेश माकर वय २३ वर्षे या दोघांना तलवार , काठयांनी मारहाण करुन खाली पाडून त्यांचे डोक्यावर दगड मारुन चेंदामेंदा करुन निघृणपणे खुन करुन पळून गेलेबाबत *यवत पो.स्टे. गु.र.नं .५८८/२०२१ भादंवि क.३०२,१४३,१४७ , १४८, १४९, ५०४, ५०६ आर्म ॲक्ट कलम ४,२५* प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
सदर गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्याने व खुन करून आरोपी फरारी झालेने गुन्हयाचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेमार्फत करणेबाबत मा.पोलीस अधीक्षक सो यांनी आदेश दिलेले होते . त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली पथक नेमण्यात आलेले होते. सदर पथकाने तपास करुन गुन्हयातील आरोपींची माहिती काढून गुन्हा करुन फरारी झालेले आरोपी महेश उर्फ मन्या संजय भागवत वय २२ वर्षे रा.पाटस, तामखडा ता.दौंड जि.पुणे,महेश मारुती टुले वय २० वर्षे रा.पाटस, तामखडा ता.दौंड जि.पुणे,युवराज रामदास शिंदे वय १९ वर्षे रा.गिरीम, मदनेवस्ती ता.दौंड जि.पुणे,गहिनीनाथ बबन माने वय १९ वर्षे रा.गिरीम, राघोबानगर ता.दौंड जि.पुणे यांना ड्रायव्हर ढाबा, बारामती एअरपोर्ट रोड येथून ताब्यात घेतलेले आहे. सदर आरोपींना पुढील कारवाईसाठी यवत पोलीस स्टेशनचे ताब्यात दिलेले आहे .
सदरची कामगिरी ही मा.पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख , बारामती विभाग अपर पोलिस अधीक्षक मिलींद मोहिते, दौंड उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, पो.उपनि रामेश्वर धोंडगे,पो.हवा. महेश गायकवाड, पो.हवा. निलेश कदम, पो.हवा. दत्ता तांबे,पो.हवा. सचिन गायकवाड, पो.हवा. सुभाष राऊत,पो.ना. गुरु गायकवाड,पो.ना. अभिजित एकाशिंगे,स.फौ. काशिनाथ राजापुरे स.फौ. शब्बीर पठाण,पो.हवा. विद्याधर निश्चित,पो.हवा. प्रमोद नवले,पो.ना. गुरु जाधव यांनी केलेली आहे.