कराड : भारतीय जनता पार्टी राज्यभरातील सर्व मंदीरे खुली करण्यासाठी करड शहरामध्ये भाजपतर्फे शंखनाद आंदोलन करण्यात आले. शहराध्यक्ष एकनाथ बागडी यांच्या नेतृत्वाखाली विठ्ठल मंदीरात शंखनाद आंदोलन झाले. यावेळी टाळमृदंगाचा गजर करत आंदोलनकर्त्यांनी मारूती बुवा मठाच्या बाहेर आंदोलन केले.
भुमिका मांडताना शहराध्यक्ष बागडी म्हणाले, महाविकास आघाडी सरकारने गेल्या पाच महिन्यात धार्मिक स्थळे बंद ठेवले आहे. त्यामुळे त्यावर जगणाऱ्यांची स्थिती बिकट झाली आहे. अन्य सर्व व्यवहार सुरळीत असताना केवळ मंदीरेच बंद का आहेत, याचा जाब सरकारला विचारयाल हवा. सर्व मंदीरे खुली करावीत, यासाठी भारतीय जनता पक्षातर्फे राज्यभर असे आंदोलन करत आहोत. त्याचाच एक भाग म्हणून कराडमध्येही आंदोलन सुरू आहे. त्या आंदोलनाची दखल घेवून सरकारने मंदीर खुली करावीत, अशी आमची मागणी आहे.
यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, श्री पेंढारकर, सुदर्शन पाटस्कर, उमेश शिंदे, रूपेश मुळे, प्रमोद शिंदे, विवेक भोसले, सागर लादे, रूपेंद्र कदम, सागर लादे, विश्वनाथ फुटाणे, उल्हास बेंद्रे, मोहन पुरोहीत, विशाल कुलकर्णी, निखील शाह, नितीन शाह, शैलेश गोंदकर, सागर लाखे, सुहास चक्के यांच्यासह मारूती बुवा मटातील सर्व वारकरी, भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.