महाराष्ट्र न्युज कराड प्रतिनिधी :
विंग ता कराड येथे पारंपारिक वाद्याच्या निनादात येथील नंदीची विसर्जन मिरवणुकीने सांगता झाली. दिडशे वर्षापुर्वीची धार्मीक पंरपरा त्यानिमीत्ताने येथे जपली. लहानग्यासह महिला अणि आबालवृध्दानी मिरवणुकीचा आनंद लुटला. वाटेगाव ( ता. वाळवा )येथील आण्णाभाऊ साठे मंडळाचे लेझीम अणि साहसी दानपट्टा मिरवणुकीचे खास वैशिष्ट ठरले.
श्रावण महिन्यात १५ ऑगष्टला येथे नंदीची मोठी यात्रा येथे भरत होती. बेंदर सणाला येथील ग्रामदैवत हनुमान मंदीरात नंदीचा प्रतिष्ठापना करून १५ ऑगष्ट दिनी विसर्जन करण्याचा परंपरा येथे होती. गावाला यात्रेचे स्वरूप येत होते. अलिकडे त्यामध्ये खंड पडला होता. मात्रा पुर्वजानी सुरू केलेली परंपरा कायम टिकावी या उदेश्याने येथील काही तरूणांनी त्यासाठी पुढाकार घेतला. अॅड. राम होगले, सामाजीक कार्यकर्ते अनिल कचरे, तंटामुक्ती समिती माजी उपाध्यक्ष विकास होगले, बाबा यादव, निवास यादव, सिताराम होगले, संजय कणसे, शंकर कुराडे, अमोल घोरपडे, सुधीर माने, संपत यादव यांनी त्यासाठी पुढाकार घेऊन नंदीची सवाद्य मिरवणुक येथे काढली. त्यास प्रतिसाद मिळाला. पारंपारिक वाद्याचा थाट अणि हलगी घुमक्याचा कटकडाटाने सर्वाचे लक्ष वेधले. वाटेगावचे लेझिम मंडळाचा शिवकालीन दानपट्टा मिरवणुकिचे खास अकर्षण ठरले. दानपट्ट्यातील विविध खेळाचे सादरीकरण मंडळाने यावेळी केले. साहसी अणि धाडसी खेळ करून दाखवले. उपस्थिताच्या डोळ्याचे पारणे त्यांनी फेडले. दुपारी दोनच्या सुमारास निघालेल्या नंदी विसर्जन मिरवणुकिची सांगता सांयकाळी उशिरा झाली. कै. दत्तात्रय कचरे स्मारक समितीच्यावतीने प्रसादवाटप झाले. तत्पुर्वी मंदरीत नंदीची पुजाअर्चा महाअरती झाली.






























