पाटण : पाटण तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेळकेवस्ती (मारुल) या शाळेच्या शिक्षिका श्रीमती शालिनी बाबर (चव्हाण) यांना अविष्कार फौंडेशन इंडिया, शाखा- सातारा यांच्या वतीने देण्यात येणाऱ्या राजमाता जिजाऊ पुरस्काराचे वितरण शनिवार दि. २५ रोजी कोल्हापूर येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे.
८ मार्च जागतिक महिला दिन २०२१ रोजी विविध क्षेत्रात कार्यरत महिलांसाठी राजमाता जिजाऊ पुरस्काराची घोषणा करण्यात आली होती. कोविड मुळे सदरचा कार्यक्रम लांबला होता.
प्रत्येक वर्षी संस्थेच्या वतीने वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात येतो. यावर्षी या पुरस्कारासाठी आपल्या पाटण तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेळकेवस्ती (मारुल) या शाळेच्या शिक्षिका श्रीमती शालिनी बाबर (चव्हाण) यांची निवड झालेली आहे. त्यांनी शैक्षणिक क्षेत्रातील यशस्वी वाटचाली सोबतच सामाजिक क्षेत्रात ही अतिशय उल्लेखनीय काम केले आहे. त्यांनी शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात विविध उपक्रम यशस्वीपणे राबविले आहेत. त्यांचे हे कार्य समाजासाठी निश्चितच प्रेरणादायी आहे. त्यामुळे यावर्षीच्या राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ या पुरस्काराने त्यांना सन्मानीत करण्यात येणार आहे. श्रीमती शालिनी बाबर (चव्हाण) यांना हा पुरस्कार मिळाल्याने विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.