लोणंद : लोणंद रेल्वे स्टेशननजीक रेल्वेच्या धडकेत अंदोरी (ता. खंडाळा) येथील एसआरपीमध्ये कार्यरत असणारे शैलेश बोडके (वय -२८) आणि त्यांचा एक वर्षांचा मुलगा यांचा दुर्दैवी मृत्यु झाला आहे.
पुणे-मिरज मार्गावरील लोणंद रेल्वे स्टेशननजीक रविवारी दि.२६ रोजी सांयकाळी बेंगलोर-जोधपूर एक्सप्रेस रेल्वेच्या (गाडी नंबर ०६५०६) धडकेमध्ये अंदोरीतील एसआरपीमध्ये कार्यरत असलेले शैलेश ज्ञानेश्वर बोडके आणि त्यांचा मुलगा रुद्र बोडके यांचा दुर्देवी मृत्यु झाला आहे.
रेल्वे पोलिसांकडून मिळालेली आधिक माहिती अशी की, अंदोरी (ता. खंडाळा) शैलेश बोडके हे धुळे येथे एसआरपीमध्ये कार्यरत आहेत. या घटनेनंतर सपोनि व्ही. आर. पाटोळे, आदीनाथ भोसले व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले होते. या घटनेचा पंचनामा करण्याचे काम रात्री उशिरापर्यत सुरु होते.
त्यांची पत्नी मुंबई पोलिसदलामध्ये आहेत. शैलेश बोडके हे सुट्टी घेऊन दोन दिवसांपूर्वी अंदोरी येथे घरी आले होते. शैलेश बोडके हे त्यांच्या रुद्र बोडके या एक वर्षाच्या मुलासह रविवारी सांयकाळी लोणंद रेल्वे स्टेशनवर गेले असता बेंगलोर-जोधपूर एक्सप्रेस या रेल्वेच्या धडकेमध्ये त्यांच्या मृत्यू झाला आहे.