बाविसाव्वा दिवशीही शासकीय पातळीवर कोणत्याही प्रकारची दखल नाही
फलटण : श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे व अर्क शाळेचे सण 2017 ते 2020 या कालावधीत निवृत्त झालेल्या, कामगारांच्या ग्रॅच्युइटीची रक्कम मिळावी म्हणून दि. 9 नोव्हेंबर 2020 पासून अधिकार गृह फलटण येथे उपोषणास बसले होते. ते उपोषण 21 दिवस चालले होते. त्यावेळी कारखान्याच्या व्यवस्थापनाने दि.29 नोव्हेंबर 2020 रोजी घटनास्थळी येऊन कामगारांशी चर्चा करून ग्रॅच्युईटी व इतर थकित रक्कम फेब्रुवारी 2021 अखेर देण्यात येईल असे लेखी आश्वासन दिले होते. त्यावर कामगारांनी विश्वास ठेवून संबंधित उपोषण स्थगित ठेवले होते.
त्यानंतर व्यवस्थापनाने दिलेल्या लेखी आश्वासनानुसार साडे पाच महिने उलटून गेले तरी, अद्याप ग्रॅच्युइटी ची व इतर थकीत रक्कम दिलेली नाही. त्यामुळे कामगारांनी सोमवार दि.6 सप्टेंबर 2021 पासून फलटण येथील प्रांताधिकारी कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषण सुरू केलेले आहे. साखळी उपोषणाचा आज बाविसाव्वा दिवस आहे.
या कालावधीत कारखान्याच्या व्यवस्थापनाने उपोषण स्थगित करण्याची विनंती केलेली आहे. पण जोपर्यंत सदरची रक्कम मिळत नाही, तोपर्यंत साखळी उपोषण चालू राहणार असल्याचे उपोषणकर्त्यांनी सांगितलेले आहे. स्थानिक राजकीय पुढाऱ्यांच्या दबावामुळे शासकीय पातळीवर ती कोणत्याही प्रकारे या साखळी उपोषणाची दखल घेतली जात नसल्याची खंत एडवोकेट नरसिंह निकम यांनी व्यक्त केली आहे. साखर आयुक्त पुणे यांच्याकडूनही या उपोषणाची दखल घेतली गेल्याचे दिसत नाही. गेल्या उपोषणाच्या वेळी उपस्थित असलेल्या सात कर्मचाऱ्यांचे निधन झाले आहे. सदर साखळी उपोषणा मुळे कारखान्याच्या व्यवस्थापनाची पळापळ सुरू असून, आठ दिवसाच्या आतमध्ये लागणाऱ्या रक्कमेची तजवीज करण्याचे आश्वासन दिले असल्याकर्ते चपोषणकर्त यांच्या वतीने सांगण्यात आले आहे. सदर उपोषणा बाबतची सुचना श्रीराम सहकारी साखर कारखाना लिमिटेड फलटणच्या अध्यक्ष व संचालक मंडळ आणि कार्यकारी संचालक यांना 18 ऑगस्ट रोजी देण्यात आलेली आहे. गेल्या उपोषणाच्या वेळी उपस्थित असलेल्या सात कर्मचाऱ्यांचे निधन झाले आहे. जोपर्यंत सदरची रक्कम मिळत नाही. तोपर्यंत साखळी उपोषण चालू राहणार असल्याची माहिती फलटण तालुका संघर्ष समितीचे अध्यक्ष एडवोकेट नरसिंह निकम यांनी दिली आहे.





















