प्रहार जनशक्ती पक्ष यांच्यावतीने आज कराडमध्ये कराड उपजिल्हा रुग्णालय चा रिक्त पदे व गैरसोयीबद्दल आमरण उपोषण
महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी : कराड उपजिल्हा रुग्णालयांमध्ये वाढत चाललेल्या गैरसोयीबद्दल प्रहार जनशक्ती पक्ष सातत्याने मागणी करून सुद्धा याकडे उपजिल्हा रुग्णालय प्रशासन कोणत्याही प्रकारचे लक्ष देत नाहीये जोपर्यंत या सर्व मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आमरण उपोषण प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने करण्यात येणार आहे.
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या पत्नी सौ वेणूताई चव्हाण यांच्या नावाने कराड येथे सुरू असलेल्या उपजिल्हा रुग्णालय गोरगरिबांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे रुग्णालय आहे कराड शहरासह कराड तालुका, पाटण , इस्लामपूर , कडेगाव , खटाव विटा तालुक्यातील हजारो गोरगरीब रुग्ण उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी येत असतात. या साठी आम्ही २०१६ पासून शासन स्तरावर पाठपुरावा करीत आहे. पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग गुहागर विजापूर राष्ट्रीय महामार्ग कराड शहरातून गेल्याने कराड परिसरात अपघाताचे प्रमाण जास्त आहे. एकूणच उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी येणार्या रुग्णांची गरज लक्षात घेता उपजिल्हा रुग्णालयात १) रिक्त डॉक्टरांची पदे – कायम स्वरूपी ( एमडी फिजिशियन , ऑर्थोपेडिक , भूलतज्ञ रेडिओलॉजिस्टिक , स्त्री रोग तज्ञ, वैद्यकीय अधिकारी भिषक, दंत शल्यचिकित्सक, डायलिसिस स्टाफ इत्यादी पदे व वर्ग 4 ची सर्व रिक्त पदे व ॲम्बुलन्स ड्रायव्हर भरणे २) सिटीस्कॅन मशिन व तज्ञ ३) एम आर आय मशीन व तज्ञ ४) ट्रॉमा केअर सेंटर सुरू करणे ५) २०० बेडचे रुग्णालय मंजूर करणे या मागण्या आम्ही सातत्याने केले आहेत.

याबाबत आम्ही दिनांक २१.११.२०१७ ते २४.११.२०१७ पर्यंत आमरण उपोषण केले होते त्या वेळी पुणे विभागीय आरोग्य उपसंचालक डॉक्टर संजय देशमुख यांनी उपोषणस्थळी भेट देऊन वरील मागण्यांची पूर्तता करण्याचे लेखी आश्वासन दिले होते, मात्र अद्याप या मागण्या पूर्ण झालेल्या नाहीत.तसेच दिनांक ३०.०८.२०२१ रोजीच्या निवेदनामध्ये उपोषणाचा इशारा दिल्यानंतर दिनांक १९.०९.२०२१ रोजी माननीय सिव्हिल सर्जन यांच्या दालनामध्ये माननीय कदम साहेब उपसंचालक विभाग यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली यावेळी सिव्हिल सर्जन वैद्यकीय अधीक्षक कराड उपस्थित होते त्यावेळी काही प्रमुख मागण्या मान्य करण्यात आल्या मात्र अद्याप रुग्णांची गैरसोय आहे तसेच आहेत. बंद पत्रित वैद्यकीय अधिकारी यांना प्राधान्याने उपजिल्हा रुग्णालय कराड या ठिकाणी नियुक्ती द्यावी तसेच स्वच्छता ठेका दिनांक १४.०१.२०२२ पासून बंद आहे स्वच्छता व परिणाम होत आहेत त्यामुळे रुग्णांची हेळसांड होत आहे त्यामुळे तात्काळ स्थानिक स्तरावर आदेश निर्गमित व्हावी तसेच लाईट बिल प्रलंबित रक्कम 34 लाख रुपये तात्काळ भरावी.तरी रूग्णालयात येणाऱ्या गोरगरीब रुग्णांना आवश्यक आरोग्य सेवा मिळत नसल्याने वरील मागण्यांची पूर्तता होण्याची गरज आहे, मात्र शासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याने. बच्चुभाऊ कडू महाराष्ट्र राज्य , प्रदेशाध्यक्ष अनिलजी गावंडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हा रुग्णालय समोर आमरण उपोषण करणार , याची दखल घ्यावी.यावेळी शिवाजी चव्हाण सचिव,प्रहार जनशक्ती पक्ष , तालुका अद्यक्ष मनोज माळी मसूर, प्रवीण शिंदे बंटीभाऊ मोरे सागर चव्हाण तिरु देवकर शरद पवार या वेळी उपस्थित होते






















