महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : प्रतापसिंह भोसले (फलटण शहर)
पुणे सातारा महामार्गावर असलेले नायगाव पुणेपासून अवघे ६० कि.मी. अंतर आहे अशा निसर्गरम्य नगरीत सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला . ब्रिटिशकाळी खंडोजी नेवसे तेथील पोलीस पाटील सर्व कारभार पहात होते , यांचा वाडा म्हणजे आजचे सावित्रीबाई फुले यांचे स्मारक होय .सन २००४ साली मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे , शरदरावजी पवार , छगनराव भुजबळ यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थित स्मारकाचे उदघाटन झाले होते .
उदघाटनाचे वैशिष्ट्ये म्हणजे १. सुमारे ५५०० स्के.फुट मध्ये भव्य स्मारक ऐतिहासिक वास्तू२. प्रथम महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचे भव्य सुशोभीकरण केलेले पुतळे३. प्रवेशव्दार लाकडी मूळ होते तेच उत्तम दर्शनीभागात दिसते ४. प्रथम हाॅलमध्ये महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा५. डाव्या रुममध्ये वाड्याचे अनेक जुने फोटो आहेत६. पुढील रूममध्ये जुनी खाट व त्याकाळचे जुने दरवाजे जतन करून ठेवलेले आहेत७. स्वयंपाक घर त्यात संग्रह असलेल्या सावित्रीबाई फुले यांचीभांडी , शिके , पाट , मुसळ व उखळ इत्यादी वस्तू ८. पुढील रूममध्ये धान्य साठवण पेव , कणगी , पाट्या , सूप , वग्रळे ९ . पुढील हाॅलमध्ये महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्यातील पत्रकार प्रति विशेष फोटो सावित्रीबाई , सगुणाबाई , फातिमा बेगम इत्यादी लावण्यात आलेले आहेत
अशा ६ रूममध्ये अतिशय उत्तम ऐतिहासिक ठेवा जतन केलेला असून बघताच क्षणी जुनी आठवण होते , आणि सावित्रीबाई फुले यांचे कार्य राहणीमान कार्यपध्द्ती आणि बालपणीचेदिवस डोळ्यासमोर आल्याशिवाय राहवत नाही , म्हणून आपल्या महापुरुषांचेस्मरण म्हणून नायगाव नगरीच्याऐतिहासिक वास्तुस भेट देणे म्हणजे सावित्रीबाई फुले यांचे बालपणाचा अभ्यास करून आपण त्याचे कार्य भावी पिढी पर्यत पोचविणे हेच खरे त्यांना अभिवादन ठरेल म्हणून प्रत्येकाने नायगाव नगरीच्या दर्शनालासावित्री शक्ती पुरस्कार सोहळा निमित्त भेट देऊन ऐतिहासिक वास्तूचे दर्शन घेऊन अभिवादन कराययास पाहिजे. याबरोबर फुले दांपत्याची कार्येमाहितीसाठी त्यांचे विचार आत्मसात करा आणि भावीपिढी पर्यत त्याचे कार्य पोचविण्यासाठी आपण कुटूंबियासह नायगावनगरीस आवर्जून भेट देऊन माता सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करा तेव्हाच आपण त्यांचे विचार स्विकारू शकतो , असे सिद्धू नाना नेवसे यांनी सांगितले.