20 कुटुंबांना किराणा साहित्य पॅकेट्स चे वाटप करत केले मदतीचे आवाहन
महारष्ट्र न्यूज लोणंद प्रतिनिधी:बिलकीस शेख
कोविड 19 च्या वाढत्या प्रदुभावाने खबरदारी चा उपाय म्हणून शासकीय यंत्रणांवतीने कडक स्वरूपातील लाॅकडाऊन ची अंमलबजावणी ऐन सिजन मध्येच करण्यात आली होती मार्च महिन्याच्या शेवटच्या काही दिवसांपासून सुरू झालेल्या लाॅकडाऊन मुळे जत्रा, आर्केस्ट्रा, तमाशा, आदी मनोरंजक कार्यक्रम तसेच मंदिरे बंद झाल्याने तमाशा लोककलावंत म्हणुन प्रसिद्ध असलेल्या कोल्हाटी समाज बांधवांवर मोठी कुर्हाडच कोसळली होती व आहे,
कोरोना व्हायरस संसर्गजन्य परिस्थिती अटोक्यात येत अनेक उद्योग व्यवसायांवरिल निर्बंध शिथिल होऊन ते पुर्ववत सुरू होत असताना ऐन सिजन गेल्याने हताश होऊन बसलेल्या या समाजाला नवरात्रोत्सवात तरी मंदिरे उघडी होतील व नृत्य वगैरे बाबींतुन थोडा फार आर्थिक आधार मिळत पोटाची खळगी भरली जाईल अशी आशा असताना श्रीक्षेत्र विर तसेच पंचक्रोशीतील अनेक मंदिरे उघडणार नसल्याने त्यांच्या अपेक्षाभंग झाल्या व बहुतांशी कुटुंबावर उदरनिर्वाह करणे जिकिरीचे झाले, असे असताना अखिल महाराष्ट्र कोल्हाटी समाज संघर्ष कृती समितीचे उपाध्यक्ष गणेश माळी यांनी खूप अपेक्षेने साथ प्रतिष्ठाण या सामाजिक संघटनेकडे सहकार्य मिळावे व आधार द्यावा म्हणून दिनांक – 10 ऑक्टोंबर 2020 रोजी पत्र व्यवहार केला,
साथ प्रतिष्ठाण वतीने त्याच दिवशी या समाजातील काही बांधवांना भेटुन त्यांची समस्या जाणून घेतल्या व आमच्या परीने लवकरच शक्य होईल ते सहकार्य करु असा विश्वास व शब्द दिला.
याच दरम्यान साथ प्रतिष्ठाण चे मार्गदर्शक सदस्य तथा अर्णव कंस्ट्रक्शन चे युवा उद्योजक आदरणीय स्वप्नील वाघमारे सो. यांचा वाढदिवस होता. साथ प्रतिष्ठाण वतीने त्यांना व त्यांचे बंधू युवा उद्योजक सुशिल वाघमारे या दोघांना भेटुन सविस्तर परिस्थिती सांगितली असता कसलाही विचार न करता त्यांनी साथ प्रतिष्ठाण माध्यमातून काही किराणा पॅकेट्स या गरजवंतांना देण्याचे कबूल केले. याप्रमाणे या कलावंतांच्या कुटुंबांना प्रत्येकी गहु, तांदूळ, तेल, खोबरेल तेल, मिठ, साबण डाळी आदी साहित्यांचे असे 20 किराणा पॅकेट्स चे अश्विनी हॉस्पिटल,जुना फलटण रोड येथे प्रसिद्ध उद्योजक स्वप्नील वाघमारे, सुशिल वाघमारे, साथ प्रतिष्ठाणचे अध्यक्ष कय्युम मुल्ला, सचिव मंगेश माने, उपाध्यक्ष दिपक बाटे, खजिनदार सचिन चव्हाण यांचे हस्ते वाटप करण्यात आले,
याप्रसंगी मनोज लाखे, गणेश गाडे, उमेश माळी, गणेश माळी, वैजनाथ गाडे, रवि लाखे आदी महिला व समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.