फलटण : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकी साठी फलटण येथील माजी नगराध्यक्ष व सद्गुरू उद्योगसमूहाचे सर्वेसर्वा दिलीपसिंह भोसले यांनी गृहनिर्माण मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. खा. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले हे ही याच मतदारसंघातून निवडणूक लढवीत आहेत.

त्यामुळे आगामी काळात दिलीपसिंह भोसले निवडणूक लढवणार की अर्ज माघारी येणार याकडे फलटण तालुक्याचे तसेच जिल्ह्याचे लक्ष लागून राहणार आहे. विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या सल्ल्यानुसार गृहनिर्माण मतदारसंघातून आपण उमेदवारी अर्ज दाखल केलेला असून त्यांच्या मार्गदर्शनानुसार पुढील वाटचाल करणार असल्याचे दिलीपसिंह भोसले यांनी स्पष्ट केले आहे.






















