पाटण:- कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने १५ ऐप्रिल पासून राज्यात लॉकडाऊनची घोषणा केली. १ मे पासून या लॉकडाऊनची अत्यावश्यक सेवेतील बाबी सोडून कडक अमलबजावणी करण्यात आली. लोकांच्या सेवेसाठी मात्र बँकिंग सुविधा सुरु ठेवण्यात आली. इतर सेवा सुविधा छोटे-मोठे व्यवसाय, उध्दोग, व्यापार यांना पुर्ण पणे बंदी करण्यात आली. यामुळे सर्वसामान्यांचे अर्थिक उत्पन्नाचे साधन पुर्ण बंद झाले. अनेक जणांचे खाण्याचे वांदे झाले. असे आसताना या लॉकडाऊन काळात बँकिंग सेवेला शासनाने प्राधान्य का..? दिले याचा विचार विनमय न करता बँकिंग सेवेतील फायनान्स कंपन्या मात्र कर्ज वसुली व कर्जाचा हाफ्ता वसुलीसाठी घरा-घरात जाऊन ग्राहकांना त्रास देत असल्याच्या घटना समोर येत आहेत. जो पर्यंत लॉकडाऊन उठत नाही तोपर्यंत बँका व फायनान्स कंपन्यांची कर्ज वसुली स्थगित करण्यात यावी अशी मागणी कर्जदारांकडून होत आहे.
राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना राज्य शासनाने महाराष्ट्रात १ मे पासून अत्यावश्यक सेवेतील बाबी सोडून कडक लॉकडाऊनला सुरवात केली. या लॉकडाऊन काळात सर्वसामान्य नागरीकांचे छोटे- मोठे उध्दोग, व्यवसाय, व्यापार, मौल-मजुरी, खाजगी नौकरी बंद झाली. यासह हातावर पोट असलेल्यांचे खाण्याचे वांदे झाले. घराबाहेर पडण्यास बंदी आणली. अर्थिक उत्पन्नाचे साधनच बंद झाले. अशा परस्थितीत मात्र ज्या सर्वसामान्य नागरिकांनी उध्दोग, व्यवसाय, व्यापाराला हातभार लागण्यासाठी बँका आणि फायनान्स कंपन्याकडून कर्ज उचलले आहे.. त्या ग्राहकांच्या पाठीमागे फायनान्स कंपन्या व बँकांनी कर्ज वसुलीसाठी तगादा लावला आहे. अरेरावी ची व अपमानास्पद भाषा कर्जदारांना वापरली जात आहे. यामुळे कर्जदार सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. सरकारने आमचा उध्दोग, व्यवसाय, व्यापार बंद केला नोकरी घालवली अशा परस्थितीत फायनान्स कंपन्या व बँकांना कर्जाचे हाप्ते कोठून द्यायचे. जो पर्यंत लॉकडाऊन आहे तोपर्यंत तरी कर्ज वसुली थांबवा. अशी मागणी या सर्वसामान्य ग्राहकांकडून होत आहे. शासनाने दुसऱ्या लॉकडाऊन काळात नागरिकांच्या आर्थिक सुविधेसाठी बँकींग क्षेत्र सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला. मात्र याचा उलट अर्थ काडून फायनान्स कंपन्या व बँकांनी सर्वसामान्य कर्जदार ग्राहकांच्याकडे कर्ज वसुलीचा तगादा लावला. फायनान्स कंपन्यांच्या अधिकारी कर्मचाऱ्यांकडून ग्राहक नागरिकांना तुच्छतेची वागणूक देऊन कर्जवसूलीसाठी अपमानित केले जात आसल्याचे प्रकार समोर येत आहेत.






















