दि एम्रल्ड स्कूल मध्ये वृक्षारोपण व विविध उपक्रमाद्वारे जयंती साजरी
फलटण : स्त्रियांसाठी साक्षरतेची वाट प्रकाशमान करणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची 191 वी जयंती साखरवाडी, ता. फलटण येथे सोमवार दि.३ रोजी डायनॅमिक एज्युकेशन सोसायटीच्या दि एम्रल्ड हाईट्स इंटरनॅशनल स्कूल येथे उत्साहात साजरी करण्यात आली.
सर्वप्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाईंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून तसेच दीपप्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापीका अंजली शिंदे यांनी सावित्रीबाईंच्या जीवनकार्याची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली. त्यानंतर जयंती निमित्त सावित्रीच्या लेकीच्या हस्ते शाळेत वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी शाळेतील मुली क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा करून आल्या होत्या. विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून शिक्षणाचे महत्त्व मुलांना पटवून देत शाळेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका अंजली शिंदे ,शितल कुंभार, शिवगंगा पवार, प्रज्ञा करे, सविता जगताप, संध्या जगताप , संगिता गायकवाड आणि कर्मचारी उपस्थित होते.