येत्या 17 तारखेला पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीलाच हजारोंच्या संख्येने आझाद मैदानावर राहणार उपस्थित. चुना भट्टी मुंबई येथे झालेल्या सकल मराठा समाजाच्या बैठकीत निर्णय.
सातारा /प्रतिनिधी
येत्या 17 तारखेला पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीलाच हजारोंच्या संख्येने आझाद मैदानावर राहणार उपस्थित. चुना भट्टी मुंबई येथे झालेल्या सकल मराठा समाजाच्या बैठकीत निर्णय.
येणारे पावसाळी अधिवेशन विविध राजकीय घडामोडींमुळे वादळी ठरणार असल्याचे चिन्हं आहेत. त्यातच मराठा समाज देखील आपल्या ओबीसी आरक्षण मागणी साठी आक्रमक झाला असून मुंबई सह राज्यात हे आंदोलन मोठे करण्यासाठी हलचाली सुरू झाल्या आहेत आहेत. साहजिकच विधानसभेत देखील त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. येत्या 17 तारखेला पावसाळी अधिवेशन सुरू होणार असून पहिल्याच दिवशी मराठा समाज मुंबईमध्ये धडकणार आहे. त्यासंदर्भातील एक महत्वपूर्ण बैठक सकल मराठा समाज भवन, चुना भट्टी मुंबई येथे पार पडली. सकल मराठा समाज व मराठ क्रांती मोर्चाचे सक्रिय पदाधिकारी या बैठकीत उपस्थित होते. ओबीसी मधून आरक्षण कसे मिळेल? यावर सखोल मार्गदर्शन केले. सदर बैठकीला मराठा वनवास यात्रा चे आयोजक योगेश केदार यांनी मार्गदर्शन केले.
पुन्हा एकदा राज्यात मराठा क्रांती मोर्चाचे वादळ निर्माण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. येत्या 2024 च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुका समोर आहेत. त्यामुळे त्या पार्श्वभूमीवर आम्ही राज्यकर्त्यांना ओबीसी आरक्षण मान्य करण्यास भाग पाडू. कर्नाटक मध्ये केवळ 17% लिंगायत समाजाने भाजप ची सत्ता घालवली. आम्ही तर महाराष्ट्रात 32% पेक्षा जास्त आहोत. मग मराठे किती गोंधळ घालतील याचा विचार राज्यकर्त्यांनी करावा. यावेळी संघटित स्वरूपात सर्वच पक्षांवर मताच्या माध्यमातून वचक ठेवली जाईल. जो पक्ष आम्हाला ओबीसी मधूनच आरक्षण देईल त्यालाच मतदान अन्यथा त्या पक्षाचा बहिष्कार करण्यासाठी मराठे सज्ज आहेत. असे मराठा वनवास यात्रा चे योगेश केदार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
मराठा वनवास यात्रा गेले अनेक महिने ओबीसी आरक्षण मागणी साठी जनजागृती करत आहे. त्यातील संपूर्ण मे महिना भर उन्हात पायी चालत तुळजापूर वरून निघत 6 जून ला मुंबई गाठली. आणि त्यानंतर एक महिन्यापेक्षा पजास्त काळापासून मराठा बांधव आझाद मैदानावर भर पावसात ठाण मांडून बसलेले आहेत. तरीही सरकार ला जाग येत नाही. त्यामुळे मराठा समाजात रोष निर्माण झाला असून तो वाढत चालला आहे. त्यामुळे जास्तीत जास्त संख्येने समाज बांधव मुंबईत दाखल होणार आहेत. मराठ्यांना ओबीसी मधूनच आरक्षण घेतल्याशिवाय मराठा मुंबई सोडणार नाहीत अशी प्रतिज्ञा मराठा समाजाने केली आहे.
सदर बैठकीला प्रीतम माने, मनोज भोसले दादा सूर्यवंशी बाबू फडतरे भरत तावरे रोहिदास काटकर सचिन थोरात मानसिंग कापसे बाबुराव मोरे विनोद जाधव स्वप्निल एरुणकर महेंद्र शिंदे प्रकाश साळुंखे प्रशांत भोसले गौरव फडतरे रामदास पवार मोहन मान कुंबरे मच्छिंद्र पवार पोपट बळी सकल मराठा समाज चुनाभट्टी सर्व कार्यकारणी आणि सदस्य उपस्थित होते