भोर प्रतिनिधी:-
भोर मांढरदेव रस्त्यावर नेरे नजीक दुचाकींची समोरासमोर धडक झाली. जुपिटर आणि युनिकॉर्न या दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. यामध्ये मांढरदेवकडून भोरला जाणाऱ्या युनिकॉर्न गाडीवरील तरुण किरकोळ जखमी झाला आहे. तर जुपिटर वर असलेले जावळे संपूर्ण वय माहित नाही. (वय ६०, निरा लोणंद) जागीच ठार झाले. तर उत्तम गायकवाड (वय ५१, निळकंठ भोर ) हे गंभीर जखमी झाले. भोर पोलिसांकडून घटनेची पाहणी करून पंचनामा करण्याचे काम सुरू असून घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अण्णा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बीट अंमलदार शिंदे करीत आहेत.