फलटण शहरातील सर्व नागरिकांची घरपट्टी माफ करावी अशी मागणी फलटणचे माजी नगरसेवक अनुप शहा यांनी केली आहे. मुंबई मध्ये घरपट्टी कर माफ केला जातो मग फलटण मध्ये कर का माफ केला जात नाही ?असा सवाल अनुप शहा यांनी केलाय मुख्यमंत्र्यांनी आपल्या पदाचा वापर करून मुंबई मधील नागरिकांना दिलासा देण्याचे काम केले आहे. अशाच पद्धतीने फलटण शहरातील नागरीकांना घरपट्टी मधुन दिलासा दिला गेला पाहीजे .कोरोना काळात अनेक लोकांच्या नोक-या गमवाव्या लागल्या तर कोणाचे व्यवसायच ठप्प झाले त्यामुळे आर्थिक दृष्या अडचणीत आले. यामुळेच फलटण तालुक्याचे आणि जिल्ह्याचे नेते तसेच विधानपरीषदेचे सभापतीपदी असणाऱ्या राम राजेंनी सुद्धा आपल्या पदाचा वापर करून फलटण च्या नागरिकांना ख-या अर्थाने दिलासा देण्याचे काम करावे अशी मागणी माजी नगरसेवक अनुप शहा यांनी केली आहे. विरोधकांना खोट्या केस मध्ये अडकवण्यासाठी पदाचा गैर उपयोग करण्यापेक्षा फलटण शहरातील नागरिकांच्या भल्यासाठी हा वापर करावा अशी टिका करत घरपट्टी माफी साठी रामराजेंना आवाहन सुद्धा अनुप शहा यांनी केलय. शहांच्या या मागणीची फलटण शहरातील नागरीकांमध्ये चांगलीच चर्चा सुरु झाली आहे.