दहिवडी : ता.०८
बारामती येथील माणवासीय रहिवाशी प्रतिष्ठानचा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. माणवासीय बांधवांचा कौटुंबिक स्नेहमेळावा आणि माणवासीय भूषण पुरस्कार वितरण सोहळा असे या कार्यक्रमाचे स्वरूप होते. यावेळी बारामतीत राहणाऱ्या माणवासीय लोकांना एक दिवस आनंदाचा साजरा करता यावा, यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी देवकर कुटुंबियांना माणवासीय भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याचबरोबर राष्ट्रीय अंधबुद्धिबळपटू संस्कृती मोरे आणि अभिराज खाडे या गुणवंत विद्यार्थ्यांना आणि माऊलीअमृततुल्य गुळाचा चहा खाडे परिवार, डॉ.राजाराम ढोक, रमेश कुलकर्णी यांनादेखील विविध क्षेत्रातील योगदानाबद्दल गौरवण्यात आले. देवेंद्र खाडे,तात्यासाहेब खाडे,आबासो जगदाळे, सुभेदार जगदाळे, गणेश पवार यांना पोलीस आणि आर्मी सेवेतील कामगिरीबद्दल सन्मानित करण्यात आले. माणवासीय भूषण पुरस्काराच्या मानपत्राचे वाचन प्रा.कल्पना बापू खाडे यांनी केले. या कार्यक्रमात गजीनृत्याच्या आविष्काराने उपस्थितांची मने जिंकली.
यावेळी माणचे आमदार जयकुमार गोरे, रणजित आण्णा पवार,माजी आयुक्त प्रभाकर देशमुख, प्रशांत सातव,अजित पवार, शशिकांत नाना देशमुख,शामराव राऊत,काशिनाथ जळक,शंकर कचरे, रामचंद्र भोसले,अशोक देवकर,बापूराव खाडे, अंकुशराव कदम, भाऊसो गायकवाड,व इतर मार्गदर्शक उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उमेश पांढरे,पिंटू खाडे, आप्पासो भांडवले,मनोज देवकर,सागर खाडे, पांडुरंग अवघडे,शिवाजी बोराटे,सयाजी जगदाळे,धनाजी जगदाळे,तात्यासाहेब खाडे,अमोल कदम, दिग्विजय गायकवाड, दुर्योधन पारसे, राहुल भोसले,लालासो माने, हनुमंत खाडे,गिरीष सूर्यवंशी, यांच्यासह माणवासीय रहिवासी प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.
प्रास्ताविक उमेश पांढरे पाटील यांनी केले तर दिग्विजय गायकवाड यांनी आभार मानले.