पुसेगाव दि .[प्रतिनिधी संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मंगळवारी सायंकाळी आपला निकाल जाहीर केला. त्यांनी मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सर्व आमदार पात्र ठरविल्याबद्दल कोरेगाव विधानसभा मतदारसंघात जल्लोष करण्यात आला. आमदार महेश शिंदे हे आमदार म्हणून पात्र राहिल्याबद्दल कोरेगावच्या जुना मोटर स्टँडवर फटाक्याची जोरदार आतषबाजी करण्यात आली. यावेळी आमदार महेश शिंदे यांच्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या.
बहुचर्चित आमदार अपात्रता प्रकरणी मंगळवारी निकाल जाहीर होणार असल्याने संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले होते. जो तो दुपारी चार वाजता मोबाईल आणि टीव्ही लावून मुंबईतील सुनावणी लाईव्ह पद्धतीने पाहण्यात मग्न होता. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना ही अधिकृत शिवसेना असल्याचे स्पष्ट करत सर्व आमदार पात्र ठरविले. ही बाब समजल्यानंतर कोरेगाव विधानसभा मतदारसंघात सर्वत्र आनंदोत्सव साजरा करण्यात आला. प्रत्येक गाव आणि वाडीवस्तीवर आमदार महेश शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांच्या आतषबाजी करत विजयाच्या घोषणा दिल्या.
कोरेगावच्या जुना मोटार स्टँडवर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहूल प्रकाश बर्गे, कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे, नगराध्यक्ष दिपाली बर्गे, उपनगराध्यक्ष सुनील बर्गे, माजी उपनगराध्यक्ष जयवंत पवार, माजी नगरसेवक महेश साहेबराव बर्गे, नगरसेवक साईप्रसाद बर्गे, सागर वीरकर, सागर बर्गे, परशुराम बर्गे, राजेंद्र वैराट, मुन्नाभाई काझी, नगरसेविका वनमाला बर्गे, शितल बर्गे, संगीता ओसवाल, स्नेहल आवटे, माजी नगरसेवक सचिनभैय्या बर्गे, बच्चू शेठ ओसवाल, रशीद शेख, दीपक कांबळे, डॉ. विघ्नेश बर्गे, अनिकेत सूर्यवंशी, बाबा दुबळे, विजय घोरपडे, संतोष बर्गे, अजित विलासराव बर्गे, शिवसेना शहरप्रमुख महेश शामराव बर्गे, दीपक फाळके यांच्यासह आमदार महेश शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत फटाक्यांची आतषबाजी केली. सुमारे अर्धा तास ही आतषबाजी सुरू होती.