मुंबई : देशात कोरोनाचा वाढता संसर्ग कायम आहे. यामध्ये दिलासादायक बाब म्हणजे रविवारी अनेक प्रमुख शहरे आणि राज्यांमध्ये दैनंदिन कोरोना रुग्णांमध्ये घट होताना दिसतं आहे. पुढील आकडेवारी पाहता कोरोना बाधित रुग्ण संख्येत घट झालेली दिसत आहे.देशातील कोरोनारुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.51 टक्के इतके आहे आणि गेल्या 24 तासात 1 लाख 38 हजार 331 रुग्ण बरे झाले आहेत. तर दुसरीकडे दैनंदिन रुग्णवाढीचा दर शनिवारी 16.66 टक्क्यांवरून रविवारी 16.28 टक्क्यांवर किरकोळ घसरला.
मुंबईत 7 हजार 895 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली, आधीच्या दिवसाच्या तुलनेत जवळपास 26 टक्के कमी आहे, तर पश्चिम बंगालमध्येही रुग्णवाढीत सुमारे 22 टक्क्यांनी घट झाली आहे. देशात रविवारी ओमायक्रॉन संसर्गाच्या विक्रमी 1,702 नवीन बाधितांची नोंद झाली आहे. ओमायक्रॉन रुग्णांची संख्या शनिवारच्या तुलनेत 28.17 टक्क्यांनी वाढली आहे. आता ही संख्या 7,743 झाली आहे.
घट होत असलेली राज्य महाराष्ट्र, बेंगळुरू, आणि पश्चिम बंगाल यांच्या समावेश आहे. मात्र गुजरात, केरळ आणि कर्नाटकमध्ये नवीन कोरोना संक्रमणांमध्ये वाढ झाली. आहे, तर चेन्नईमध्ये किरकोळ वाढ झाली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रविवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या 24 तासांत एकूण 2 लाख 71 हजार 202 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. भारतात सध्या 15 लाख 50 हजार 377 सक्रिय कोरोनारुग्ण आहेत.