कराड : भारताचे पहिले ऑलम्पिकवीर स्व. खाशाबा जाधव यांना मरणोत्तमर भारतरत्न पुरस्कार देऊन त्यांचा योग्य सन्मान करावा, अशी मागणी शिवसेना उपतालुकाप्रमुख काकासाहेब जाधव यांनी केली.
स्व. खाशाबा जाधव यांच्या ३६ वी पुण्यतिथीनिमित्त शिवसेनेच्यावतीने गोळेश्वर, ता. कराड येथील त्यांच्या निवासस्थानी अभिवादन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
काकासाहेब जाधव म्हणाले, स्वतंत्र भारताला पहिले ऑलम्पिक
पदक मिळवून देत कराड तालुक्याचे नाव जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवले. कुस्ती या मर्दानी खेळाचे महत्त्व वाढले. त्यांची प्रेरणा घेऊन अनेक मल्ल महाराष्ट्र केसरी व हिंदी केसरी बनले आहेत. त्यांनी खुप प्रतिकुल परिस्थितीत भारत देशाला सर्वात पहिले ऑलम्पिक पदक मिळवून दिले. याची दखल घेऊन भारत सरकारने त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देऊन त्यांचा योग्य सन्मान करावा.
यावेळी खाशाबा जाधव यांचे सुपुत्र रनजित जाधव, नातू अमरदीप जाधव, शहर प्रमुख शशिराज करपे, काकासाहेब जाधव, शशिराज करपे, प्रवीण लोहार, पांडुरंग करपे, अनिल देशमुख उपस्थित होते.