विविध शाळा, हायस्कुल आणि व्यायामशाळांना मिळाले साहित्य
सातारा- आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पाठपुराव्यातून सातारा तालुक्यातील विविध प्राथमिक शाळा, हायस्कुल यांना क्रीडा साहित्य, १३ व्यायामशाळांना आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी सुमारे १ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता. या मंजूर निधीतून सर्व शाळा, हायस्कुल, व्यायामशाळांना नुकतेच साहित्य वाटप करण्यात आले आहे.
आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या माध्यमातून आणि सातारा पंचायत समितीच्या सभापती सौ. सरिता इंदलकर यांच्या मागणीनुसार जिल्हा क्रिडाधिकारी, सातारा यांच्यामार्फत हा निधी मंजूर करण्यात आला होता. मंजूर निधीनुसार क्षेत्रमाहुली, गोवे, चिंचणी, वर्णे, करंडी, काशीळ, नुने, मस्करवाडी, संगममाहुली, सारखळ, सोनगाव, जिल्हा क्रीडा संकुल समिती सातारा, धावडशी येथील व्यायामशाळांना साहित्य वाटप झाले.
कामथी, आकले, लिंब शाळा नं. १, चोरगेवाडी, नागेवाडी, पिसाणी, कोंडवे, पेट्री, कळंबे आदी प्राथमिक शाळांसाठी तसेच आदर्श विद्यालय पेट्री, करपे हायस्कुल वर्ये, न्यू इंग्लिश स्कुल कण्हेर आदी हायस्कुलसाठीही क्रीडा साहित्य उपलब्ध झाले असून त्या- त्या शाळा, हायस्कुल यांना सदरचे साहित्य देण्यात आले आहे. याशिवाय नुने न्यू इंग्लिश स्कुल येथे संरक्षक भिंत बंधने, धावडशी येथील ब्रम्हेन्द्रस्वामी हायस्कुल येथे शौचालय बांधणे, नेले- किडगाव येथील भैरवनाथ विद्यालय येथे भांडारगृह बांधणे यासाठीही भरीव निधी मिळाला असून हि कामेही पूर्णत्वाकडे गेली आहेत.