महाराष्ट्र न्युज फलटण प्रतिनिधी / गणेश पवार :
कोरोनाचा प्राधुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला असून प्रत्येक गाव व वाड्या वस्त्यांवर आता रुग्ण संख्या वाढत चालली असून सरकारी व खाजगी दवाखाने अपुरे पडत असून आता प्रत्येक गावात विलगीकरणं कक्ष सुरू करायला सुरुवात केली असून ग्रामपंचायत तडवळे यांच्या वतीने ब्रेक द चैन अंतर्गत कोरोना रूग्णांसाठी प्राथमिक शाळेत विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.
आज ६एप्रिल पासुन गावातील प्रत्येक नागरिकांचे आठवडयातुन दोन वेळा टेम्प्रेचर,ऑक्सिजन व पल्स चेक करण्याची मोहीम हाती घेण्यात आली असून ज्या नागरिकांना सौम्य लक्षण असतील त्यांनी विलगीकरण कक्षात दाखल व्हावे असे आवाहन ग्रामपंचायत तडवळे यांनी केली असून यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डाॅ.तृप्ती गिरी, डॉ मुलाणी, सरपंच अशोक खराडे (फौजी)उपसरपंच,सर्व ग्रामपंचायत सदस्य, विकास सो. चेअरमन, रयत क्रांतीचे जिल्हा अध्यक्ष अमोल खराडे, आशा सेविका, अंगणवाडी सेविका व मदतनीस, ग्रामसेवक व ग्रामपंचायतीचे सर्व कर्मचारी वर्ग व गावातील सर्व युवक वर्ग व ग्रामस्थ यांचे सहकार्य लाभले असल्याचे ग्रामपंचायत कडून सांगण्यात आले.