
कटगुण सोसायटीचे कटगुण, उंबरमळे, काटकरवाडी, धा, शिंदेवाडी ते कार्यक्षेत्र आहे. सोसायटीवर माजी सरपंच नितीन पाटील गटाची ४० वर्षे एक हाती सत्ता होती. शिवप्रेमी – महात्मा फुले सहकार पॅनेल ज्येष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली नवनाथ वलेकर व उदय कदम यांनी नियोजनबद्ध पद्धतीने निवडणुकीला सामोरी गेले. त्यामुळे ४० वर्षांच्या सत्तेला सुरुंग लावण्यात नवीन चेहऱ्यांना यश आले. निवडणूक जिंकण्यासाठी आ. महेश शिंदे यांनी ताकद लावली होती.
निवडणुकीत शिवप्रेमी – महात्मा फुले सहकार पॅनेलचे विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे – सर्वसाधारण कर्जदार मतदारसंघ पोपट गायकवाड, माधव वलेकर, किरण गायकवाड, नारायण गायकवाड, बापूराव गायकवाड, धनराज काटकर, विजय कदम, महिला राखीव सुमन गायकवाड, शेवंता वलेकर, ओबीसी शिवाजी गो, विमुक्त जाती व भटक्या जमाती नवनाथ वलेकर, अनुसूचित जाती व जमाती मीना जावळे निवडून आल्या आहेत.
किसन गायकवाड, शिवाजी गायकवाड, माधव गायकवाड, संभाजी गायकवाड, अमोल गायकवाड, हरिभाऊ गायकवाड, सुकुमारी जगताप, युवा नेते जितेंद्र गोरे, पै. शंकर वलेकर, अरुण पाटील, सुधीर गोरे, प्रकाश गोरे, नंदकुमार गोरे, बाळू गोरे, संतोष गुरव, ज्योतीराम काटकर, जयराम निकम, किरण निकम, मधुकर गोडसे, आनंदराव काटकर, सुभाष काटकर, मधुकर गायकवाड, चिमण काटकर, भीमा काटकर, बंडा गोसावी, रघुनाथ फाळके, महेश वाघ, संभाजी वलेकर यांच्यासह कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.
सर्व विजयी उमेदवारांचे आ. शशिकांत शिंदे, मा. जि. प. अध्यक्षा गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी, जि. प. उपाध्यक्ष प्रदीप विधाते, नियोजन समिती सदस्य सागरभाऊ साळुंखे, संतोष साळुंखे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष बाळासाहेब जाधव, माजी सरपंच राजेंद्र माने, हनुमंत बोटे यांनी अभिनंदन केले.
* सभासदांचा विश्वास सार्थ ठरवू…
कटगुण सोसायटीची निवडणूक अत्यंत अटीतटीची झाली. मात्र सभासदांनी विरोधकांच्या भूलथापांना बळी न पडता परिवर्तन घडवून इतिहास घडवला आहे. सभासद आर्थिक समृद्ध व्हावा यासाठी यापुढे प्रयत्न करणार आहे. आ. शशिकांत शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या गायत्रिदेवी पंतप्रतिनिधी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध विकासाच्या योजना राबवून शेतकरी सभासदांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरवू.
नवनाथ वलेकर,
लोकनियुक्त सरपंच व नवनिर्वाचित संचालक
* आ. महेश शिंदे यांना होमपीचवर व्हाईट वॉश ….
कोरेगाव विधानसभा मतदार संघातील खटाव, पुसेगाव जिल्हा परिषद गटात सोसायटी नोंदणीचा जोरदार रणसंग्राम सुरू आहे. ललगुण, बुध, दरूज सोसायटीच्या निवडणुकीत आ. महेश शिंदे गटाचा दारुण पराभव झाला आहे. हे तिन्ही पराभव आ. महेश शिंदे यांना जिव्हारी लागला आहे. कोणत्याही परिस्थितीत कटगुण सोसायटीची निवडणूक जिंकायची या इराद्याने आ. महेश शिंदे, त्यांच्या पत्नी डॉ. प्रिया शिंदे व बहिण डॉ. अरुणा बर्गे हे उतरले होते. परंतु राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी व मतदारांनी आ. महेश शिंदे यांना त्यांच्याच हॉम्पीचवर व्हाईट वॉश दिला आहे.





















