
यावेळी सभेच्या अध्यक्षस्थानी वसंतराव आपटे यांची उपस्थिती होती. यावेळी संस्थेचे गव्हर्निंग कौन्सिल चेअरमन बाळासाहेब कुलकर्णी, सेक्रेटरी चंद्रशेखर देशपांडे, जॉईंट सेक्रेटरी राजेंद्र लाटकर, संस्थेचे कौन्सिल सदस्य व नवनियुक्त विश्वस्त व मान्यवरांची उपस्थिती होती.
शिक्षण मंडळ कराड या संस्थेच्या सन २०२२ – २७ या कालावधीसाठी अध्यक्ष ,उपाध्यक्ष व विश्वस्त निवडीची विशेष सर्वसाधारण सभा नुकतीच खेळीमेळीत पार पडली. सभेच्या प्रारंभी संस्थेच्या संस्थापक सदस्यांच्या प्रतिमेचे पूजन व लोकमान्य टिळक यांच्या पूर्णाकृती प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिक्षण मंडळ कराड शिक्षण मंडळ कराड चे सेक्रेटरी चंद्रशेखर देशपांडे यांनी सभेच्या नोटीस चे वाचन केले ,
गव्हर्निंग कौन्सिलचे चेअरमन बाळासाहेब कुलकर्णी यांनी या विशेष निवडी जाहीर केल्या
संस्थेच्या सन २०२२ ते २०२७ साठीचे प्रवर्गनिहाय विश्वस्त मंडळाची अधिकृत घोषणा यावेळी करण्यात आली यावेळी आश्रयदाते या प्रवर्गातून बाळासाहेब कुलकर्णी, चंद्रशेखर देशपांडे ,ना. बाळासाहेब पाटील, डॉ माधव कुमठेकर, अॅड विक्रम कुलकर्णी यांची निवड झाली असून, सहाय्यक सभासद प्रवर्गातून श्रीमती अनघा परांडकर ,अॅड. अरविंद घाटे, अॅड.बळवंत बुधकर, सुधीर घाटे ,डॉ. सौ. मीना पेंढारकर तर सर्वसामान्य प्रवर्गातून राजेंद्र लाटकर, काशिनाथ कुलकर्णी व उदय थोरात यांची विश्वस्त पदी निवड झाल्याबद्दल यावेळी त्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
संस्थेच्या प्रेसिडेंटपदी डॉ .अनिल हुद्देदार, व्हाईस प्रेसिडेंट सेक्सी पदी उमेशकुमार लाहोटी, अभय भंडारी,डाॅ. हेमंत ताम्हणकर व सुरेश अराणके यांची बिनविरोध निवड झाली असल्याचे संस्थेचे गव्हर्निंग कौन्सिल चेअरमन बाळासाहेब कुलकर्णी यांनी जाहीर केले.
या विशेष निवडीसाठी कौन्सिल सदस्य ॲड बळवंत बुधकर, अॅड, अरविंद घाटे ,सहाय्यक सभासद विनायक कवडे, सुनील मुद्रावळे,शशिकांत गाडगीळ यांनी अनुमोदन दिले.
या विशेष सर्वसाधारण सभेचे प्रास्ताविक व स्वागत सेक्रेटरी चंद्रशेखर देशपांडे यांनी केले तर आभार जॉईंट सेक्रेटरी राजेंद्र लाटकर यांनी मानले यावेळी टिळक हायस्कूल च्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत सादर केले.





















