
वाई तालुक्याला जोडणारा महत्वाचा रस्ता असून गेल्या अनेक वर्षांपासून हा रस्ता फक्त जावळी तालुक्यात वन विभागाच्या हद्दीत दोन किलोमीटर अंतरामध्ये प्रलंबित राहिला आहे. या करिता राजकिय रेट्याची आवश्यकता असतांना श्रेयवाद यात अडसर असल्याचे निदर्शनास येत आहे. येथें राजकिय इच्छाशक्ती आवश्यकता आहे. ती प्रभळ असल्यास हा रस्ता चुकटकी सरसी होऊ शकतो.
बावधन-हुमगाव रत्याकरिता चाळीस गावांतील लोकांनी निर्माण केलेली कृतीसमिती त्याकरिता सक्रीय झाली असून त्याअंतर्गत गावोगावचे ठराव घेण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. लवकरचं जमा झालेल्या ठरावांच्या प्रति आमदार , खासदा, मंत्री महोदय यास सुपुर्द करण्यात येणार आहेत..
नुकतीचं कृतीसमितीची तिसरी मीटिंग करहर येथील विठ्ठल मंदिरात पार पडली असून
अशोक सरकाळे, सयाजी शिंदे,रवी परामने, संदीप पवार, रवी गावडे, नितीन गोळे, रवी पार्टे, बापू दुर्गावळे, किरण कळंबे, उल्हास गायकवाड, प्रकाश गोळे, भाऊसाहेब जंगम, सुरेश गोळे, आनंदराव पांगारे, शेखर पोफळे, अमर तरडे, सर्जेराव यादव, दत्तात्रय यादव, आदी उपस्थित होते.
चौकट: वाई तालुक्याच्या हद्दीतील रस्ता मार्गी लावण्याचे काम आमदार मकरंद पाटील यांच्या माध्यमातून झालेच आहे. तरी सुद्धा उर्वरित रस्ता पूर्णत्वास नेहण्यास आज त्यांच्याही सहकार्याची गरज जावळी तालुक्यातील चाळीस गावांना आहेच.
चौकट: बावधन- हुमगाव रस्त्याने दोन्ही तालुके जवळ येणार आहेत. मेढा-वाई हे अंतर सुद्धा कमी होणार आहे. मेढा- वाई नोकरी साठी जाणाऱ्या नोकरदारांना जवळच मार्ग उपलब्ध होणार आहे. तर चाळीस गावांतील लोकांना बाजारपेठ त्याच बरोबर अत्यंत निकडीची वैद्यकीय सेवा तात्काळ उपलब्ध होण्यास मदत होणार आहे..
प्रतिक्रिया: बावधन-हुमगाव रस्ता जावळीतील ४० गावांच्या अस्मितेचा प्रश्न असून हा रस्ता झाल्यास या गावांचा वाई सारख्या समृद्ध शहाराशी संपर्क वाढल्याने अनेक अडचणींचा दुष्काळ निकाली निघणार आहे. याकरिता स्थानिक आमदार शिवेंद्र राजे भोसले व आमदार शशिकांत शिंदे यांनी पुढाकार घेऊन वन वनविभागाच्या हद्दतील जागेचा प्रश्न निकाली लावून चाळीस गावांचा रस्त्याचा प्रश्न सोडविण्यास प्राधान्य कर्म द्यावा..





















