
वीटभट्टी व्यवसाय करणारे सर्व तरुण तालुक्यातील स्थानिक असून सर्व सुशिक्षित बेरोजगार असल्याने हा व्यवसाय करण्यासाठी अनेक तरुणांनी बँक व राष्ट्रीय बँकेतून कर्ज घेऊन व्यवसाय सुरु केला आहे. व्यवसाय टप्प झाल्याने बँकेचे हप्ते देणे, कर्ज फेडणे अवघड झाले आहे. मार्च ऐंडीग मुळे या बँका कर्जाच्या परतफेडीसाठी दारात येवून उभ्या राहू लागल्या आहेत. अशा परिस्थितीत व्यवसाय टप्प झाल्याने तरुणांच्यावर बेकारीची वेळ आली आहे. या व्यवसायावर केवळ तरुणांचे भवितव्य अवलंबून नसून पाटण तालुक्यातील बहुतांश मोलमजुरी करणाऱ्या लोकांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. विटभट्टीवर अवलंबून असणाऱ्या लोकांचा विचार करुन माती उत्खनन व वीटभट्टी व्यवसाय चालू करण्यास परवानगी द्यावी. या मागणीचे निवेदन प्रांताधिकारी सुनील गाढे व तहसिलदार रमेश पाटील यांना वीटभट्टी व्यवसायकांनी दिले आहे. या निवेदनावर दिनकरराव धामनकर, राजेंद्र साळुंखे, हणमंत शिर्के, गोविंद घाडगे, बापूराव कुंभार, विशाल शिर्के, अदित्य खैरमोडे, कृष्णत मोळावडे, रोहित कुंभार, आदीसह पाटण तालुक्यातील सर्व वीटभट्टी व्यवसायकांच्या सह्या आहेत.
































