गेली चार वर्षे झाले क्रुष्णा नदीवरील नवीन पुलाचे काम सुरू आहे काम संथगतीने चालू आहे काम चालू असल्यामुळे वाहतुकीची वारंवार कोंडी होऊन सर्वसामान्य जनतेला याचा मोठा त्रास सहन करावा लागतो कराड विजापूर रस्ता असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूकीची कोंडी होत आहे सर्व कॉलेज विद्यानगर परिसरात असल्यामुळे विद्यार्थ्यांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागतो राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी यांचे याकडे दुर्लक्ष आहे महामार्गाच्या अधिकार्यांनी सर्वसामान्य प्रवाशांना होणारा त्रास संपवावा अन्यथा गोवारे सैदापूर ओगलेवाडी बनवडी येथील ग्रामस्थांना घेऊन पुलावर आंदोलन करणार असल्याचे साजिद मुल्ला यांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे