
*जल जीवन मिशन ही केंद्र पुरस्कृत महत्वाकांक्षी योजना असून, या योजनेतून ग्रामीण भागातील नागरिकांच्या जीवनशैलीत सुधारणा होण्याच्या दृष्टीने दरडोई दररोज 55 लिटर गुणवत्तापुर्ण नियमित पिण्याचे पाणी घरगुती नळ जोडणीद्वारे* *उपलब्ध करुन देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. सातारा जिल्हयामध्ये एकुण 1701 गावांमध्ये योजना राबविण्यात येत असून जिल्हयातील एकुण 5 लाख 77 हजार 43 ग्रामीण कुटुंबांपैकी 4 लाख 77 हजार 927 कुटुंबांना (82.82 टक्के) नळजोडणी देण्यात आली आहे.*
*सातारा जिल्हा टँकरमुक्त करण्याच्या अनुषंगाने मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आढावा घेऊन जिल्हयामध्ये मागील 10 वर्षामध्ये ज्या गावांना टँकरने पाणी पुरवठा करावा लागला आहे, अशा जिल्हयातील एकुण 258 गांवांमध्ये जल जीवन मिशन योजनेतून प्राधान्याने कामे घेऊन सदरची गावे टँकरमुक्त करण्यासाठी सर्व अधिकारी यांनी कालबध्द कार्यक्रमानुसार *कार्यवाही करण्याच्या सुचना मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिल्या.*
































