
दि.०३/०३/२०२२ रोजी दाऊद हाजीसाहेब इनामदार वय ६५ वर्षे धंदा गॅरेज व अॅटो स्पेअर पार्ट विक्री यांनी पोलीस स्टेशनमध्ये येवुन तक्रार दिली की त्यांची मालकीची सोनगिरवाडी वाई येथे असलेले इनामदार अॅटो स्पेअर पार्ट नावाच्या दुकानाचे कुलुप तोडुन त्यामधील ७०,००० / – रु किंमतीचे चार ऑईलचे कॅन , नविन क्लज प्लेटा, एक्सेल शॉप , टॉमी, अॅम्बेसिटरचा गिअर बॉक्स असे साहित्य अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेले आहे.वगैरे मजकुरची तक्रार दिलेने गुन्हा दाखल करणेत आलेला आहे .
सदरचा गुन्हा दाखल होताच बाळासाहेब भरणे , पोलीस निरीक्षक , वाई पोलीस ठाणे यांनी याबाबतची माहीती अजयकुमार बन्सल , पोलीस अधीक्षक सातारा, अजित बो – हाडे अपर पोलीस अधीक्षक सातारा, शितल जानवे खराडे उप विभागीय पोलीस अधिकारी , वाई विभाग वाई यांना कळवून त्यांच्या मार्गदर्शन व सुचना नुसार गुन्हे प्रकटीकरण विभागाचे कर्मचा – यांच्ये मार्फतीने अज्ञात आरोपीचा व चोरीस गेले मालाचा शोध घेत असताना बाळासाहेब भरणे , पोलीस निरीक्षक यांना माहीती मिळाली की सदरची चोरी दोन आरोपींनी केलेली असुन त्यांनी चोरी केलेले साहित्य श्रीरामनगर धोम कॉलनी वाई येथे ठेवलेले आहे. त्यानंतर गुन्हेप्रकटीकरण विभागाचे कर्मचा – यांनी सदर ठिकाणी जावुन सापळा लावुन दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले व त्यांचे राहते घराची घरझडती घेतली असता त्यामध्ये इनामदार अॅटो नावाचे दुकानातुन चोरीस गेलेला माल व किरणा मालाने भरलेली दोन प्लॅस्टिकची पोती असा एकुण ८५,००० / – रु.चा माल हस्तगत केला आहे . आरोपीकडे विचारपुस करता त्यांनी काल रात्री इनामदार अॅटो गॅरेज सोनगिरवाडी वाई व खानापुर ता वाई गांवातील पदमश्री कम्युनिकेशन अॅन्ड किराणा स्टोअर्स नावाचे दुकानाची कुलपे तोडुन चोरी केले असल्याचे कबुल केले आहे . सदर आरोपना गुन्ह्याचे तपास कामी अटक केले असून पुढील तपास महिला पोलीस नाईक सोनाली माने या करीत आहेत .
सदरची कारवाई अजयकुमार बन्सल , पोलीस अधीक्षक सातारा , अजित वो – हाडे अपर पोलीस अधीक्षक सातारा, शितल जानवे खराडे उप विभागीय पोलीस अधिकारी , वाई विभाग वाई यांच्या मार्गदर्शनाखाली बाळासाहेब भरणे , पोलीस निरीक्षक वाई पोलीस स्टेशन , सतिश पवार सहा. पोलीस निरीक्षक पांचगणी पोलीस स्टेशन, स्नेहल सोमदे महिला पोलीस उपनिरीक्षक गुन्हे प्रकटीकरण विभागाचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजय शिर्के , महीला पोलीस नाईक सोनाली माने , पोलीस कॉन्स्टेवल किरण निंबाळकर , प्रसाद दुदुस्कर, श्रावण राठोड यांनी केलेली आहे .




















