गिरवी केंद्रातील जिल्हा परिषद शाळा मधुन विविध शैक्षणिक उपक्रम व प्रकल्प यांचे आयोजन.
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
फलटण तालुक्यातील गिरवी केंद्रातील जिल्हा परिषद शाळा जाधववाडा,चाहुरमळा,गुरवदर जननीमळ हराटीमळा धुमाळवाडी, गिरवी, बोडकेवाडी,निरगुडी,माळेवस्ती या विविध शाळांमध्ये भारतीय सण व उत्सव यासंबंधीची माहिती विविध शाळांमध्ये विद्यार्थी यांना देण्यात आली.अशी माहिती गिरवी केंद्राचे केंद्रप्रमुख अनिलकुमार कदम यांनी दिली.
शाळा परिसरातील कचरा गोळा करण्यासाठी साफसफाई स्वच्छता अभियान राबविले.एकत्रितपणे गोळा केलेल्या केर कचरा याची पर्यावरण पुरक होळी करुन वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी उपयुक्त शैक्षणिक उपक्रम राबविण्यात आला.
भारतीय संस्कृतीत मानवी जीवनाच्या कल्याणासाठी अनेक वेगवेगळ्या प्रकारचे सण व उत्सव साजरे केले जातात.यासंबधी विद्यार्थी यांना भारतीय सण व उत्सव यासंबंधीची माहिती देऊन अंधश्रद्धा निर्मूलन, अनिष्ट प्रथा परंपरा रूढी याबाबत प्रबोधन करण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी उपयुक्त उपक्रमाचे आयोजन करण्यात येते.
भारतीय संस्कृतीत मानवी जीवनात आनंद व उत्साह सणांच्या निमित्ताने मिळत असतो.या भारतीय सण व उत्सव यांच्या पार्श्वभूमीवर गिरवी केंद्रातील जिल्हा परिषद शाळा मधुन विविध शैक्षणिक उपक्रम व प्रकल्प राबवण्यात येतात.यामधुन विद्यार्थी यांची लेखन,वाचन,सभाधिटपणा, संकलन, निरीक्षण, संवाद, चर्चा,शोध, तुलनात्मक अभ्यास, विश्लेषण, पृथक्करण, निष्कर्ष या विविध प्रकारच्या क्षेत्रातील प्रेरणादायी प्रगती होत असते.